Sanchar Saathi Apps All SmartPhone : प्रत्येकाच्या फोनमध्ये असणार संचारसाथी ॲप्स, Uninstall करता येणार नाही
देशातील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता तुमच्या मोबाईलमध्ये संचारसाथी (Sanchar Saathi Apps) हे एप्लीकेशन बाय डिफॉल्ट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या एप्लीकेशनला अन इन्स्टॉल (Install)करता येणार नाही.

देशातील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता तुमच्या मोबाईलमध्ये संचारसाथी (Sanchar Saathi Apps) हे एप्लीकेशन बाय डिफॉल्ट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या एप्लीकेशनला अन इन्स्टॉल (Install)करता येणार नाही. सरकारने हा निर्णय नेमका का घेतला? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सायबर घोटाळे थांबणार?
भारतामध्ये दिवसेंदिवस सायबर घोटाळे होत आहेत. आणि त्याला रोखण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेशन टाकण्यात येणार आहे. वापरकर्त्यांना हे ॲप्लीकेशन आणि इन्स्टॉल म्हणजेच डिलीट करता येणार नाही.
सर्व फोनमध्ये असणार इंस्ट्रॉल
बाजारात नवीन येणाऱ्या सर्व फोनमध्ये आता हे ॲप्लिकेशन सुरुवातीपासूनच मिळेल. यासोबत जुन्या सर्व स्मार्टफोन मध्ये देखील अपडेटद्वारे संचारसाठी हे ॲप्लिकेशन टाकण्यात येणार आहे. सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी 90 दिवसाच्या आत सर्व स्मार्टफोन कंपन्यांना करावी लागणार. हा नियम ॲपल, सॅमसंग, विवो, शाओमी, google आणि इतर कंपन्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. संचारसाठी हे ॲप पहिल्या वापरात स्पष्टपणे दिसावे आणि त्याच्या फीचर्समध्ये कंपन्यांनी अडथळा आणू नये असे देखील सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
फोन शोधण्यात मदत होणार
सरकारच्या म्हणण्यानुसार संचारसाठी या एप्लीकेशन मुळे सायबर सुरक्षित वाढ होईल. हे ॲप IMEI नंबर द्वारे हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन शोधून देण्यास मदत करते. देशभरात या ॲपने कोट्यवधी लोकांच्या मोबाईलचा डेटा आणि फसवणूक टाळली आहे. यामुळे लाखो फोन ब्लॉक करण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात चोरी झालेले मोबाईल सापडण्यास आणि हस्तगत करण्यास या नवीन ॲपमुळे यश आले आहे. तर फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरर्सचा तपास सुद्धा या नवीन ॲपमुळे लागला आहे. हे ॲप मोठ्या प्रमाणात इन्स्टॉल करण्यात येत आहे. तर याची विश्वासहर्यता आणि लोकप्रियता वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे ॲप बाय डिफॉल्ट इन्स्टॉल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर आता लवकरच सर्वांच्या फोनमध्ये संचारसाठी हे नवीन एप्लीकेशन टाकण्यात येणार आहे. सरकारच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

























