एक्स्प्लोर
भगवा हा गौरवशाली रंग : काँग्रेस खासदार शशी थरुर
टीम इंडियाच्या विश्वचषकातील अवे सामन्यासाठी भगव्या रंगाची जर्सी बनवण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू नवी भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरले.
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या विश्वचषकातील अवे सामन्यासाठी भगव्या रंगाची जर्सी बनवण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू नवी भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरले. नवी जर्सी अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. परंतु या भगव्या रंगावरुन देशभरात मोठं राजकारण झालं. जर्सीच्या भगव्या रंगाला विरोध करणाऱ्या आणि त्यावरुन राजकारण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.
थरुर नव्या जर्सीबाबत बोलताना म्हणाले की, भगवा हा गौरवशाली भारतीय रंग आहे. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार दोन संघांच्या जर्सीचा रंग सारखा असेल तर, यजमान संघाला त्यांच्या जर्सीचा रंग बदलण्याची आवश्यकता नाही. परंतु पाहुण्यांना त्यांची जर्सी बदलून खेळावे लागेल. इंग्लंड आणि भारतीय संघाची जर्सी एकाच रंगाची असल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला वेगळ्या रंगाची जर्सी परिधान करणे बंधनकारक होते. हा वेगळा रंग म्हणून भारताने भगव्या रंगाची निवड केली आहे. हा गौरवशाली भारतीय रंग आहे.
भारताच्या जर्सीमध्ये भगवा रंग आहे मग हिरवा का नाही? -अबू आझमी | मुंबई | ABP Majha
थरुर एवढ्यावरच थांबले नाहीत. थरुर स्वतः हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. ते म्हणाले की, मीदेखील या सामन्यात भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भगव्या रंगाचे जॅकेट घालून मैदानात उपस्थित होतो.
👕👌👍 pic.twitter.com/FBOVyIj9cu
— Virat Kohli (@imVkohli) June 29, 2019
We have had quite a few questions about MS Dhoni's different bats at #CWC19
Here's the answer: the 🇮🇳 wicket-keeper is using them to pay tribute to the brands that have helped him throughout his career! pic.twitter.com/7y2h00CXxe — Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement