एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एक हजाराची नवी नोट बाजारात येणार?
नोटाबंदीमध्ये रद्द करण्यात आलेली 1 हजार रुपयाची नोट पुन्हा नव्याने बाजारात येण्याची चिन्हं आहेत.
नवी दिल्ली: नोटाबंदीमध्ये रद्द करण्यात आलेली 1 हजार रुपयाची नोट पुन्हा नव्याने बाजारात येण्याची चिन्हं आहेत. दोनशेची नवी नोट बाजारात येऊन काही दिवस उलटले आहेत, त्यानंतर आता पुन्हा एकदा एक हजाराची नवी नोट चलनात येण्याची शक्यता आहे.
सरकार लवकरच नव्या 1 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘डीएनए’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या नव्या नोटेमध्ये अतिरिक्त सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.
नव्या एक हजाराच्या नोटेची रचना (डिझाईन) आणि छपाईसाठी लागणाऱ्या कागदाची तयारी झाली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ही नोट बाजारात येऊ शकते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सलबोनी इथे या नोटांची छपाई करण्यात येणार आहे.
पुन्हा 1 हजाराची नोट चलनात का?
गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी पाचशे आणि हजाराच्या चलनी नोटा रद्द केल्या.
त्यानंतर सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र पाचशेनंतर थेट दोन हजाराची नोट असल्यामुळे दोन्हीमधील अंतर खूप आहे. हा गॅप भरुन काढण्यासाठी हजाराची नवी नोट आणण्याचा सरकारचा विचार आहे.
50 आणि दोनशेची नोट
रिझर्व्ह बँकेने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 ऑगस्ट 2017 रोजी दोनशे रुपयांची नवी नोट बाजारात आणली. तर नव्या 50 रुपयाच्या नोटेचीही घोषणा केली आहे.
छोटे छोटे व्यवहार करणं सुरळीत व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. ही नोट एटीएममध्ये उपलब्ध नाही, तर तुम्हाला ती बँकेतच मिळणार आहे.
छोट्या व्यवहारांसाठी छोट्या नोटा
छोटे व्यवहार सुलभ करण्यासाठी छोट्या नोटा बाजारात आणल्या जात आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात छोट्या व्यवहारांचं प्रमाणं मोठं आहे. त्यामुळे अशा व्यवहारांसाठी छोट्या मूल्यांच्या नोटा आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
सध्या भारतात 1, 2, 5,10, 20, 50,100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. शंभर आणि 500 च्या नोटांमधील तफावत दूर करण्यासाठी 200 ची तर 500 आणि 2000 मधील तफावत दूर कऱण्यासाठी 1 हजार रुपयांची नोट चलनात आणली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement