एक्स्प्लोर

...तर रेल्वेत नोकरी मिळणं कठीण, रेल्वे मंत्रालयाने घेतली कठोर भूमिका

RRB NTPC Result : आरआरबीकडून आयोजित करण्यात आलेल्या एनटीपीसी सीबीटी-1 च्या निकालात त्रृटी आढळल्यामुळे बिहामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

RRB NTPC Result : आरआरबीकडून आयोजित करण्यात आलेल्या एनटीपीसी सीबीटी-1 च्या निकालात त्रृटी आढळल्यामुळे बिहामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. सोमवारी सुरु झालेल्या आंदोलानाला मंगळवारी हिंसक वळण लागलं. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आक्रमक झाले होते. यावेळी विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.  आक्रमक विद्यार्थ्यांनी नालंदा, गया या भागात रेल्वे थांबवल्या तर काही भागात रेल्वेची जाळपोळही करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी रेल्वे पटरी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अनेक रेल्वे रखडल्या होत्या. विद्यार्थ्यांनी लावलेले आरोप रेल्वेने फेटाळले आहेत. 

 रेल्वे मंत्रालयाने अधिकृतरित्या नोटीस जारी करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चाप बसवला आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, रेल्वे रुळांवर आंदोलने, रेल्वे वाहतूक विस्कळीत करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या बेकायदेशीर कृत्यामध्ये रेल्वेत नोकरी करणारे इच्छूक उमेदवार सामील असल्याचे समोर आले आहे. अशा दिशाभूल करणारी आंदोलने म्हणजे अनुशासनहीनतेची सर्वोच्च पातळी आहे. त्यामुळे असे उमेदवार रेल्वे/सरकारी नोकऱ्यांसाठी अयोग्य ठरतात. विशेष एजन्सीच्या साह्याने या आंदोलनातील व्हिडीओचा तपास केला जाणार आहे. त्यानंतर बेकायदेशीर कृत्यामध्ये असणाऱ्या उमेदवारांविरोधात कारवाई केली जाईल. तसेच अशा उमेदवारांना रेल्वेत नोकरीसाठी आजीवन बंदीही घातली जाऊ शकते. 

आरआरबी प्रामाणिकपणे न्याय आणि पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडून हिंसक आंदोलनात सहभागी होऊ नये. दरम्यान, रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने याप्रकरणी तपास करण्यासाठी एका कमिटीची स्थापना केली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (आरआरबी) आयोजित केलेल्या परीक्षेतील यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेणार आहे. ही कमिटी दोघांच्या तक्रारींची दखल रेल्वे मंत्रालयाला रिपोर्ट देणार आहे. 
रेल्वेमंत्री काय म्हणाले?
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने एका टप्प्यात परीक्षा घेणे शक्य नव्हते.  त्यामुळे दोन लेव्हल करण्यात आल्या होत्या. आता आम्ही यावर विचार करत आहोत. मी विद्यार्थ्यांना आवाहान करतो की, रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती आहे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या मागणीची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेऊ नये. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईस. या साठी नेमलेल्या कमिटीने 4 मार्चपर्यंत रिपोर्ट द्यायचा आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Embed widget