एक्स्प्लोर

रॉबर्ट वाड्रांवर आज ईडीकडून 40 प्रश्नांची सरबत्ती!

रॉबर्ट वाड्रांना आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावे लागले आहे. त्यांची आज सकाळी 11.20 पासून ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरु झाली. बेहिशेबी मालमत्ता आणि लंडनमधील अवैध संपत्ती खरेदीप्रकरणी वाड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रांना आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावे लागले आहे. त्यांची आज सकाळी 11.20 पासून ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरु झाली. बेहिशेबी मालमत्ता आणि लंडनमधील अवैध संपत्ती खरेदीप्रकरणी वाड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज वाड्रा यांची 2010 साली लंडनहून सुमीत चड्डा नावाच्या व्यक्तीनं पाठवलेल्या मेलवर चौकशी होणार आहे. त्या मेलमध्ये लंडनमधील संपत्तीच्या नूतनीकरणाचा उल्लेख होता. सुमीत चड्डा हे आर्म्स डीलर संजय भंडारी यांचा चुलत भाऊ आहे. तरी, डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं काल वाड्रा यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, सुमीत चड्डा यांच्या 2010 सालच्या मेलवर आज ईडीकडून 40 प्रश्न वाड्रांना विचारले जाणार आहेत. काल ईडीसमोर वाड्रा यांची 6 तास चौकशी चालली, मात्र, ती किती वेळ चालेल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान दुपारी त्यांना लंचब्रेक देण्यात आला होता. लंचब्रेकनंतर पुन्हा चौकशी सुरु झाली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे हा तपास गोपनीय असून तपासातील माहिती उघड होत असल्याचा आरोप वाड्रांच्या वकीलांनी केला आहे. काल  ईडीनं 6 तास कसून चौकशी केली काल मनी लॉड्रिंगप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांची अमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं 6 तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान वाड्रा यांना 36 प्रश्न ईडीकडून विचारण्यात आले होते. सोबतच वाड्रांना ईमेल आणि कागदपत्रांची विचारणा केली गेली तसेच अनेक व्यक्तींची नावं घेण्यात आली होती. वाड्रांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आरोप फेटाळून लावले होते. लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मनोज अरोरा स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीचा माजी कर्मचारी आहे. वड्रा यांच्याशी संबंधित या कंपनीने 2008 मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 3.5 एकर जमीन 7.50 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन 58 कोटी रुपयांना विकली आणि 509 कोटी रुपये नफा कमाविला, अशी नोंद एफआयआरमध्ये आहे. आपण मनोज अरोराला ओळखत असलो तरी त्याने आपल्यासाठी काही ई-मेल लिहिले नसल्याचं रॉबर्ट वाड्रा यांनी काल सांगितलं होतं. काल रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रियांका गांधीदेखील सोबत आल्या होत्या. दरम्यान, वाड्रा यांना मनी लाँड्रिंगप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय मनी लाँड्रिंग हा प्रकार गंभीर असून वाड्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला होता. काय आहे प्रकरण ? शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रांवर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज आरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये अर्थिक देवाण-घेवाण आणि लंडनमधील घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 19 पाउंड म्हणजे म्हणजे 19 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार ऑक्टोबर 2009 मध्ये करण्यात आला असून जून 2010 मध्ये याची विक्री करण्यात आली. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले होते. वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई विदेशात जमवलेल्या संपत्तीच्या चौकशी संबंधित होती. त्याचबरोबर सुरक्षा सामग्रीच्या खरेदीत काही संशयिताना दलाली मिळाल्याच्या चौकशीबाबत ही झडती घेतली गेली. वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या दिल्ली, नोएडा, सुखदेव विहार आणि जयपूर या परिसरात ही छापेमारी करण्यात आली होती. कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. कायदा आणि घटनेचा अवमान करत ईडीने वाड्रा यांच्यावर ही कारवाई केली असल्याच्या आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget