Republic Day 2021 Guest : यंदा प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे!
प्रजासत्ताक दिन 2021 ला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. राब म्हणाले, की "आमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे."
I'm pleased that PM Boris Johnson has invited PM Modi to join the UK-hosted G7 summit next year. UK PM Johnson has also accepted the very generous invitation to attend India's Republic Day celebrations in January, which is a great honour: UK Foreign Secretary Dominic Raab https://t.co/GS1YTD0FeW pic.twitter.com/VPW7JsQrnQ
— ANI (@ANI) December 15, 2020
यानंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांमधील एका नव्या युगाचं प्रतीक असेल.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब भारत दौर्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची आज भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की आम्हाला भारताशी आर्थिक संबंध बळकट करायचे आहेत. ते म्हणाले की दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्यांनी चर्चा केली, ज्या समान चिंता आहेत.
तब्बल 27 वर्षानंतर ब्रिटीश पंतप्रधान पुढच्या महिन्यात भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यापूर्वी जॉन मेजर हे 1993 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.