एक्स्प्लोर
Advertisement
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच 20 रुपयाची नोट चलनात
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच 20 रुपयांची नवी नोट बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
नवी दिली : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच 20 रुपयांची नवी नोट बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयच्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. बाजारात येणारी 20 रुपयांची नवी नोट ही जुन्या नोटेपेक्षा आकाराने 20 टक्के लहान असणार आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात 500 आणि एक हजार रुपयांचा नोटा चलनातूत रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने 200 आणि दोन हजार रुपये मुल्याच्या नव्या नोटा बाजारात आणल्या. त्यासोबतच आरबीआयने आतापर्यंत 10, 50, 100 आणि 500 रुपये मुल्यांच्या नोटांमध्ये बदल केले आहेत. आता केवळ 20 रुपयाच्या नोटेत बदल करणे बाकी होते. त्यानुसार आता आरबीआय नवी 20 रुपयांची नोट चलनात आणणार आहे.
20 रुपयाच्या नवीन नोटेवर महात्मा गांधी यांची प्रतिमा असेल. नवी नोट जुन्या नोटेपेक्षा 20 टक्के लहान असेल. तसेच वेगळी रंगसंगती आणि डिझाईन असेल. नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही चलनात सुरुच राहतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. मार्च 2018 पर्यंत देशातील एकून चलनात 20 रुपयांच्या नोटांचे एकूण प्रमाण 9.8 टक्के इतके होते, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
पुणे
भारत
Advertisement