आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीटरवरुन दिली माहिती
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्वीटरवरुन ही माहिती दिली.
![आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीटरवरुन दिली माहिती RBI Governor Shaktikanta Das tests positive for Coronavirus आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीटरवरुन दिली माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/26012822/Das.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती सध्या ठिक असून गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. मला कोरोना झाला असला तरी आरबीआयमधील काम सामान्य मार्गाने सुरू राहील.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मला कोविड -19 ची लागण झाली आहे. मला कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. माझी तब्बेत आता ठिक आहे. माझ्याक संपर्कातील लोकांनी काळजी घ्यावी. आयसोलेशनमध्ये राहुन मी काम करणार आहे. आरबीआयमधील काम सामान्य पद्धतीने सुरू राहील. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार आहे”
भारतात रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर
कोरोनाविरोधातील लढाईत भारताने आणखी एक यश मिळवलं आहे. देशात रोज नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची रिकव्हरी रेट 90 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासात 50,129 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 62,077 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले. देशात सध्या 6 लाख 68 हजार 154 अॅक्टिव रुग्ण आहेत. संपूर्ण कोरोना बाधित संख्येचे तुलनेत हे प्रमाण 8.50 टक्के आहे तर आतापर्यंत 70 लाख 78 हजार 123 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सक्रिय आणि बरे झालेल्या केसेसमधील दरी सतत वाढत आहे. देशात सक्रिय आणि बरे झालेल्या रूग्णांमधील फरक 64 लाखांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सांगण्यात आले की, गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या एक हजाराहून कमी झाली आहे, तर 2 ऑक्टोबरपासून ही संख्या 1100 पेक्षा कमी राहिली आहे.
मागील 24 तासांत 50 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांमध्ये 79 टक्के रुग्ण हे फक्त 10 राज्यातील आहेत. सर्वाधिक नवीन रुग्णांच्या बाबतीत केरळने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. एकीकडे, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि केरळमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 8253, महाराष्ट्रात 6417 आणि कर्नाटकात 4,471 रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्ये 4,148 लोक संसर्गित झाले आणि दिल्लीमध्ये 4,116 लोकांना या विषाणूची लागण झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश (3434), तामिळनाडू (2886), उत्तर प्रदेश (2178), छत्तीसगड (2011) आणि राजस्थान (1852) यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)