Ranjitsinh Disale : अमेरिकेत फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी गेलेल्या डिसले गुरूजींचा सहकाऱ्यांसह स्वातंत्र्यदिन साजरा; पाहा क्षणचित्रे
Ranjitsinh Disale : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी डिसले गुरूजींनी अमेरिकेतील अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या फेलोसह स्वातंत्र्यदिन 2022 साजरा केला.
Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे अखेर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी सध्या अमेरिकेत आहेत. काही महिन्यापूर्वी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार आहेत. काल भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी अमेरिकेतील अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या फेलोसह स्वातंत्र्यदिन 2022 साजरा केला.
Celebrated #IndependenceDay2022 with Fulbright Fellows at #ArizonaStateUniversity. pic.twitter.com/m7ZqtoPLa8
— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) August 15, 2022
स्कॉलरशिप जाहीर झाल्यानंतर मोठा त्रास सहन करावा लागला होता
अमेरिकेत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाल्यानंतर डिसले यांनी शैक्षणिक रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी शिक्षण विभागाकडून मोठा त्रास देखील त्यांना सहन करावा लागला होता. अखेर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मध्यस्तीनंतर डिसले यांची शैक्षणिक रजा मंजूर झाली होती. मात्र दुसरीकडे डिसले यांची चौकशी सुरुच होती. रणजितसिंह डिसले हे आपल्या प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर होते असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व त्रासाला कंटाळून जुलै 2022 मध्ये डिसले यांनी आपल्या उपशिक्षक पदाचा राजीनामा देखील दिलेला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. यानंतर 2 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता.
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल विज्ञान प्रयोग शिकवले
काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?
- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप
- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर
- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या