एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

फेसबुकवर वादग्रस्त धार्मिक पोस्ट, तरुणीला कोर्टाने कुराण वाटण्याची शिक्षा फर्मावली

जामीन मंजूर करताना तिला कुराणच्या पाच कॉपी वाटण्याचे आदेश दिले. यातील एक कॉपी अंजुमन इस्‍लामिया कमिटीला आणि चार प्रति विविध शाळा आणि कॉलेजमध्ये वाटण्यास सांगितले आहे.

रांची : रांचीच्या दिवाणी न्यायालयाने फेसबुकवर धार्मिक वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन देताना त्या मुलीला मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराणाच्या पाच प्रति वाटण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून हिंदू संघटना नाराज झाल्या आहेत. दरम्यान सदर मुलीच्या  वकिलांनी 15 दिवसांत आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हिंदू संघटना आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी रांचीच्या रिचा भारती नावाच्या मुलीने  तबरेज मॉब लिंचिंग प्रकरणासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर केली होती. या प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन तिला अटक करण्यात आले होते. यानंतर तिला कोर्टात दाखल करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश मनीष सिंह यांनी रिचाचा जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना तिला कुराणच्या पाच कॉपी वाटण्याचे आदेश दिले. यातील एक कॉपी अंजुमन इस्‍लामिया कमिटीला आणि चार प्रति विविध शाळा आणि कॉलेजमध्ये वाटण्यास सांगितले आहे. या निर्णयावर रिचाने  नाराजी व्यक्त केली आहे. यावर तिने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटना याआधीही झाल्या आहेत. त्यावेळी आरोपींना मंदिरात जाऊन हनुमान चालीसा आणि गीता वाचण्यास का सांगितले नाही. तिने आपल्यासोबत अन्याय झाला असल्याचे म्हटले आहे.  हिंदू  जागरण मंचाने देखील या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  फेसबुकवर हिंदू देवी देवतांच्या विरोधात देखील अशा पोस्ट करून अपमान केले जातात. मात्र अशा प्रकारचे काहीही वाद होत नाहीत. मात्र हे काहीतरी षडयंत्र आहे, असा आरोप हिंदू जागरण मंचाने केला आहे. रिचा  कॉलेज विद्यार्थिनी असून पहिल्या वर्षात शिकत आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर स्थानिकांमध्ये रोष पसरला होता. काही हिंदू संघटनांनी सुटकेसाठी निदर्शनही केलं होतं. मात्र नंतर दोन्ही समुदायांनी संमती दर्शवल्यानंतर न्यायालयाने रिचा भारतीला जामीन मंजूर केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget