एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाजपेयी, मनमोहन आणि मोदी सरकारमध्येही मंत्रिपद, रामविलास पासवान सहाव्यांदा मंत्री
रामविलास पासवान हे अटलबिहारी वाजपेयी यांच्याही मंत्रिमंडळात होते, मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातही त्यांनी मंत्रिपदाची धुरा वाहिली आणि आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान हे बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. गेल्या 32 वर्षांत 10 निवडणुका लढवलेल्या पासवान यांनी आठ वेळा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पासवान यांची तब्बल सहाव्यांदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे. रामविलास पासवान हे अटलबिहारी वाजपेयी यांच्याही मंत्रिमंडळात होते, मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातही त्यांनी मंत्रिपदाची धुरा वाहिली आणि आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला आहे.
1977 मध्ये देशात बदलाचे वारे वाहू लागले होते. काँग्रेस नावाचं वादळ जवळपास शांत झालं होतं. बिहारमधील हाजीपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आणि जनता पक्षाच्या तिकीटावर रामविलास पासवान पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले. तीनच वर्षांत, म्हणजे 1980 मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. आणीबाणीला विरोध करत जनता पक्षाने काँग्रेसला पराभूत केलं. हाजीपूरची जागा टिकवण्यात पासवान यांना पुन्हा यश आलं.
31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी काँग्रेससाठी ही सहानुभूतीची लाट ठरली. हाजीपूरमध्ये काँग्रेसचे राम रतन राम निवडणूक जिंकले आणि पासवान पराभूत झाले.
काँग्रेसला 1989 मध्ये या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. त्यावेळी जनता दल झालेल्या पक्षाच्या तिकीटावर पासवान पुन्हा खासदार झाले. त्यानंतर 1996, 1998, 1999, 2004 मध्ये रामविलास पासवान सलग खासदारपदी निवडून आले. 2004 मध्ये जदयूच्या तिकीटावर पासवान निवडून आले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन झालं. 2009 मध्ये दुसऱ्यांदा पासवान यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2014 मध्ये पासवान निवडणूक जिंकले, तो त्यांचा आठवा विजय होता.
2019 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय रामविलास पासवान यांनी घेतला. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. यंदा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ हाजीपूरमधून त्यांचे बंधू पशुपती कुमार पारस विजयी झाले. तर पुत्र चिराग पासवान यांनीही जमुई लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. यंदा निवडणूक न लढवताही त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आलं आहे. 72 वर्षीय पासवान हे यंदाच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात वयोवृद्ध मंत्री असल्याची माहिती आहे.
रामविलास पासवान यांची मंत्रिपदं
1996-98 - रेल्वेमंत्री (एच डी देवेगौडा सरकार)
1999-01 - संपर्क आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री (अटलबिहारी वाजपेयी सरकार)
2001-02 - खाण मंत्री (अटलबिहारी वाजपेयी सरकार)
2004-09 - रसायने आणि खते मंत्री (मनमोहन सिंह सरकार)
2014-19 - ग्राहक सेवा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) (नरेंद्र मोदी सरकार)
2019 - ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement