(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम सर्वांमध्ये आहे, भूमीपूजनाचा दिवस म्हणजे, राष्ट्रीय एकतेची संधी : प्रियांका गांधी
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भूमीपुजनाचा सोहळा रंगणार आहे. त्यासंदर्भात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
नवी दिल्ली : अयोध्येत उद्या राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. भूमी पूजनासाठी तयारी जोरात सुरु आहे. भूमी पूजनच्या कार्यक्रमाबाबत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्वीट केलं आहे. प्रियांका गांधी यांनी लिहिलं आहे की, 'राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. रामललाच्या मंदिराच्या भूमी पुजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळावात सहभागी व्हा.
प्रियांका गांधी यांच्या ट्वीटमध्ये काय लिहिलं आहे?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लिहिलं आहे की, 'साधेपणा, धैर्य, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू राम नावाचा अर्थ आहे. राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. भगवान राम आणि देवी सीता यांचा संदेश आणि त्यांच्या आशीर्वादासोबत प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळावात सहभागी व्हा.'
प्रियांका गांधी यांनी ट्वीटसोबतच आपलं पत्रही पोस्ट केलं आहे. पाहा पत्र :
प्रियांका यांचं समर्थ, दिग्विजय यांचा विरोध
दरम्यान, प्रियांका गांधी यांची पोस्ट अशा वेळी आली आहे, जेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतत राम मंदिर भूमी पूजनाच्या वेळेचा विरोध करत आहेत. दिग्विजय सिंह यांनी आज एबीपी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटलं आहे की, 'मंदिराचं भूमीपूजन शुभ मुहूर्तावर केलं जात नाहीये. राम मंदिर धर्म आणि आस्थेचा विषय आहे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही.'
दिग्विजय सिंह यांनी सांगितलं की, 'आपल्या सर्वांचीच इच्छा आहे अयोध्येत भगवान राम मंदिर तयार व्हावं. आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्हाला फक्त एवढचं हवं आहे की, शुभ मुहूर्तावर राम मंदिराच्या भूमी पुजन व्हावं. राम आमचे आराध्य दैवत आहे. सनातन धर्माचे संत शंकराचार्य यांनी वर्षांपर्यंत राम मंदिर तयार करण्यासाठी लढा दिला. मी त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच सांगितलं की, मंदिराच्या भूमी पूजनासाठी ही तारिख शुभ नाही.'
महत्त्वाच्या बातम्या :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 29 वर्षांपूर्वीच राम मंदिर बांधण्याचा संकल्प; ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठींची माहिती
- राम मंदिरासाठी 81 वर्षांच्या आजींचा 28 वर्ष उपवास; अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनानंतरच संकल्प सोडण्याचा निर्धार
- कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
- Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?
- Ram Mandir Ayodhya | राम मंदिरासाठी चांदीच्या विटा नको, पैसे द्या, राम मंदिर ट्रस्टचं लोकांना आवाहन
- Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही
- राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?
- भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
- Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण