(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
'अयोध्येत मंदीर साकारलं जात असलं तरीही, आम्हा कारसेवकांची जी इच्छा आहे. ज्याप्रमाणे भव्य मंदीर मनात आहे, त्याप्रमाणे होत नाही.', अशी खंत बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गुन्हा दाखल झालेल्या संतोष दुबे यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ज्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एक म्हणजे संतोष दुबे. बाबरी प्रकरण ज्यावेळी घडलं त्यावेळी संतोष अवघ्या 22 - 23 वर्षांचा शिवसैनिक. गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात गाजलेल्या मु्द्दा निकालात निघाला असून अयोध्येत अखेर राम मंदीर बांधण्यात येणार आहे. 5 ऑगस्टला राम मंदीराच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशातच राम मंदिर बनत असताना या शिवसैनिकांच्या मनातल्या भावना काय आहेत? याप्रकरणाशी निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरं संतोष दुबे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येत होणाऱ्या राम मंदीराच्या भूमीपुजनाबाबत बोलताना संतोष दुबे म्हणाले की म्हणाले की, 'अयोध्येत मंदीर साकारलं जात असलं तरीही, आम्हा कारसेवकांची जी इच्छा आहे. ज्याप्रमाणे मंदिर मनात आहे, त्याप्रमाणे होत नाही. विश्व हिंदू परिषदेने एक एकरातल्या मंदिराचा आराखडा बनवला आहे. पण सुप्रीम कोर्टाने निकाल देताना 70 एकर जमीन दिली आहे. या मंदिराला भव्य बनवण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हायला हवेत, तेवढे प्रयत्न केले जात नाही. राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्टमध्ये असे काही लोक सहभागी आहेत. जे काम करत नाहीत'
शिवसेनेला कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आलेलं नाही, यावरून बोलताना ते म्हणाले की, 'सत्य तर हे आहे की, सगळं शिवसेनेनेच केलं, यांनी फक्त गर्दी जमवली होती. ढांचा गिराकर आयोगे, तभी चेहरा दिखाना हा बाळासाहेबांचा आदेश होता. हा अपराध असेल तर मी मानतो की, राम कार्य करणं हे माझ्यासाठी पुण्यचं होतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'शिवसेनला बोलावलं नाही, यात काहीच नवं नाही. मंगल पांडेच्या पूर्वजांना, चंद्रशेखरच्या पूर्वजांना आणि छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रतापच्या वंशजाना बोलावलं जातं का? संघ परिवाराशी संबंधित लोकांना बोलावण्यात आलं आहे. जे काम करत नाहीत त्यांनाच बोलावलं जातं. यात काहीच नवं नाही. पण ज्यांनी खरं काम केलं त्या शिवसैनिकांना मात्र बाजूला ठेवण्यात आलं आहे.'
राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह 'हे' पाच जण!
भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी बाळासाहेबांसोबत झालेल्या भेटीबाबत सांगताना संतोष दुबे म्हणाले की, 'दंगे बाबरी मशिद पाडल्यामुळे झाले नाहीत, तर सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे झाले आहेत. आजही अयोध्येत विचारा लोकांना माहिती आहे, खरं काम शिवसेनेनचं केलं आहे. यासंपूर्ण केसमध्ये एकदा लखनौला बाळासाहेब आले होते. तेव्हा मी त्यांना वाकून नमस्कार करायला गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, 'तू राम कार्य केलं आहेस. तू नमस्कार नाही करायचा, तुझी जागा गळा भेटीची आहे. माझ्या पक्षाला, मला अभिमान वाटावा असं कार्य तू केलं आहेस. तू मेरा शेर बच्चा है.' शिवसेनेने महाराष्ट्रात जे केलं ते बहादुरीचंच केलं, भाजपवाले अंधारात सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिवसेनेने तर दिवसाउजेडी बनवलं आहे.'
शिवसेनेबाबत बोलताना ते म्हणाले की, 'आज काय आहे याबाबत मला माहिती नाही, पण मला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कायम दिसते. त्यामुळे मी कायम शिवसेनेत राहणार आहे. आम्ही त्यामुळेच शिवसेनेला आधार मानतो.'
महत्त्वाच्या बातम्या :
- Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?
- Ram Mandir Ayodhya | राम मंदिरासाठी चांदीच्या विटा नको, पैसे द्या, राम मंदिर ट्रस्टचं लोकांना आवाहन
- Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही
- राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?
- भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
- Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण