एक्स्प्लोर

Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?

ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. या कार्यक्रमाला 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. या कार्यक्रमाला 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधू, संत, अधिकारी, नेता, विहिप- न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील 50 विशेष अतिथी सहभागी होणार आहेत. यामध्ये देशातील मोठ्या उद्योगपतींचा देखील समावेश असणार आहे. याबाबत नुकतीच राम मंदीर ट्रस्टने एक यादी जाहीर केली आहे. ज्यात मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतू सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबाद पर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे.

सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचं अयोध्येत येतं आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विशेष अतिथिच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँडग्लोज, मास्क आणि सँनिटायझर वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय अयोध्येत करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी माध्यमांना माहिती देताना राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले होते की, राम मंदिराची उभारणी गुजरातमधली सोनपुरा कुटुंब करणार आहे. याचं कुटुंबानं प्रसिद्ध सोमनाथाचं मंदिर, अंबाजींच्या मंदिराची उभारणी केली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणीदेखील त्यांनी केली आहे. राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे 161 फूट असणार आहे. हे मंदिर दोन मजली असेल या दोन मजल्यांच्यावर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आलं आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यावर 161 फूटांचं मंदीराचं बांधकाम होणार आहे. अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात 20 फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे. तसेच अधिक तीन शिखरं करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे.

संबंधित बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

El Nino Impact : चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
Allahabad High Court : बलात्कार ही एक कायदेशीर संज्ञा, वैद्यकीय नाही; हायमेन फाटले याचा अर्थ असा होत नाही की...; अलाहाबाद उच्च न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण
बलात्कार ही एक कायदेशीर संज्ञा, वैद्यकीय नाही; हायमेन फाटले याचा अर्थ असा होत नाही की...; अलाहाबाद उच्च न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
Ketan Agrawal Pune Lohagad Case: पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
Uddhav Thackeray: हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
हे 'ऑपरेशन टायगर' नाही 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा 'मामा' केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
Embed widget