एक्स्प्लोर

राज्यसभा खासदारांचा शपथविधी; प्रियांका चतुर्वेदींची मराठीत, तर उदयनराजेंची इंग्लिशमध्ये शपथ

राज्यसभेऐवजी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचा हात धरलेल्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डाँ. भागवत कराड, शरद पवार आणि भाजपच्या उदयनराजे यांनी शपथ घेतली.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा राज्यसभेत न होता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडला. देशभरातून 20 राज्यांमध्ये निवडून आलेल्या 62 खासदारांचा शपथविधी आज पार पडला. जे खासदार आज शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचा शपथविधी अधिवेशनाच्या वेळी पार पडणार आहे. आज ज्या खासदारांनी शपथ घेतली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डाँ. भागवत कराड यांचा समावेश होता.

राज्यसभेऐवजी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचा हात धरलेल्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डाँ. भागवत कराड, शरद पवार आणि भाजपच्या उदयनराजे यांनी शपथ घेतली. यापैकी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डॉ. भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली. तसेच पक्षांतर करून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. तसेच शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भवानी जय शिवाजी ची घोषणाही केली.

पाहा व्हिडीओ : राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा 

मध्यप्रदेशात झालेल्या सत्तापालटानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचाही आज शपथविधी सोहळा पार पडला. तसेच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही आज खासदारकीची शपथ घेतली.

महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली शपथ :

शरद पवार उदयनराजे भोसले प्रियांका चतुर्वेदी डॉ. भागवत कराड राजीव सातव रामदास आठवले

दरम्यान, देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. आजा खासदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संसदेची दारं खुली करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हा सोहळा पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या : 

एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं दुःख; मी नाराज नाही : संजय काकडे

महाविकास आघाडीमधील राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात

राज्यसभेच्या निवडणुकीत पळवापळवीचं राजकारण, तीन राज्यांमध्ये भाजपचं काँग्रेसपुढे आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget