एक्स्प्लोर

एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं दुःख; मी नाराज नाही : संजय काकडे

भाजपकडून औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिसरी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे चर्चेत असणारे एकनाथ खडसे आणि संजय काकडे यांना संधी मिळाली नाही. यावर पत्रकार परिषद घेत मी नाराज नसल्याचे काकडेंनी सांगितलंय.

पुणे : मला पक्षाचा निर्णय मान्य आहे. रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले हे बाहेरुन पक्षात आले आहेत. मी ही बाहेरून आलोय. त्यामुळे तिघेही उमेदवार बाहेरचे नकोत म्हणून कदाचित पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचं खासदार संजय काकडे म्हणाले. मात्र, एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नसल्याचं दुःख असल्याचं काकडे यांनी सांगितले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मला राज्यात इंटरेस्ट आहे, दिल्लीत नाही. असं सांगत उमेदवारी न मिळाल्यानं नाराज नसल्याचं संजय काकडे म्हणाले. भाजपकडून औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिसरी उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधी रामदास आठवले आणि उदयनराजेंची नावं घोषित झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंची राज्यसभेवर वर्णी लागावी, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. याशिवाय संजय काकडे यांनाही पुन्हा संधी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे सांगितले. दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर, राहुल गांधींच्या विश्वासामुळे 45 व्या वर्षी राज्यसभेत म्हणून मला संधी दिली नाही : संजय काकडे रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले हे दोघंही भाजपमध्ये बाहेरुन आले आहेत. मी ही बाहेरून आलोय. त्यामुळे तीघेही उमेदवार बाहेरचे नकोत म्हणून कदाचित पक्षाने उमेदवारी नाकारली असावी, असा दावा संजय काकडे यांनी केला आहे. यावेळी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी दिली नसल्याने दुःख झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, खडसेंना राज्यात काहीतरी पद मिळेल. तसा त्यांना शब्द दिला असेल, असेही ते म्हणाले. माझी राज्यसभेची मुदत संपली, की मी भाजपचे सदस्यत्व घेईन, असे सांगत पक्ष मलाही कुठेतरी संधी देईल, अशी आशा काकडेंनी व्यक्त केलीय. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघेही माझे मित्र असल्याचं सांगत एकप्रकारे मला दारे खुली असल्याचा इशारा, काकडेंनी दिल्याचं बोललं जात आहे. स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहील; राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यानं चंद्रकांत खैरे यांची खदखद शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, तर काँग्रेसकडून राजीव सातव यांना संधी राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. रावते, खैरे यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर, काँग्रेसनं राजीव सातव यांचं नाव घोषित केलंय. मात्र, महाविकासआघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. ही जागा कुठल्या पक्षाकडे जाते. हे पाहणं आता महत्वाचं असेल. Rajya Sabha Election | राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे आणि रामदास आठवलेंचा उमेदवारी अर्ज

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
Pune Peoples Bank : पुणे पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन समारंभ दिमाखात संपन्न; दिग्गजांची हजेरी
पुणे पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन समारंभ दिमाखात संपन्न; दिग्गजांची हजेरी
Amol Palekar On Vidyanand Bapat: 'एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण...'; अमोल पालेकरांचं विद्यानंद बापटांवरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
'एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण...'; अमोल पालेकरांचं विद्यानंद बापटांवरचं वक्तव्य चर्चेत
Pune Crime News: जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Embed widget