एक्स्प्लोर
Advertisement
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित
एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वंदना चव्हाण विरुद्ध हरिवंश अशी लढत होणार आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उपसभापतीपदाची निवडणूक गुरुवारी म्हणजे 9 ऑगस्टला होणार आहे. सरकार आणि विरोधकांकडेही संपूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वंदना चव्हाण विरुद्ध हरिवंश अशी लढत होणार आहे.
नाव चर्चेत असणं हिच आनंददायी गोष्ट : वंदना चव्हाण
"उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी नाव चर्चेत असणं हेच माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. पण सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एकमताने निर्णय घेतील. जो निर्णय होईल तो सगळ्यांनाच मान्य असेल," अशी प्रतिक्रिया वंदना चव्हाण यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. "लोकसभेत सुमित्रा महाजन आहेतच आणि राज्यसभेतही एखाद्या महिलेला ही जबाबदारी मिळाली तर आनंदच होईल. महिलांचे विषय, त्यांचे प्रश्न आम्ही सभागृहांमध्ये मांडत असतो पण अशा जबाबदारीने त्यात अजून वाढ होईल," असंही खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या.
भाजप मोठा पक्ष, पण...
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप सभागृहात सर्वात मोठा पक्ष असा असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्र पक्ष आणि काही अपक्ष अशी जोडतोड करुन 115 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण 13 खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्चित नाही.
विरोधकांच्या एकीची परीक्षा
तर उपसभापतीपदाची निवडणूक ही विरोधकांच्या एकीची परीक्षा घेणारी आहे. भाजपला नमवण्याची संधी असल्याने सगळे विरोधक राज्यसभेत एकत्र येणार का याची उत्सुकता आहे.
राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा? (एकूण 245 जागा, रिक्त 1)
एनडीए
भाजप 73
जेडीयू 6
शिवसेना 3
अकाली दल 3
एआयएडीएमके 13
आरपीआय 1
सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1
तेलंगणा राष्ट्र समिती 6
नागा पिपल्स फ्रंट 1
अपक्ष 4
नामनिर्देशित 3
एकूण 115
यूपीए
काँग्रेस 50
समाजवादी पक्ष 13
राष्ट्रवादी काँग्रेस 4
डीएमके 4
आरजेडी 5
इंडियन युनियन मुस्लीम लीग 1
केरळ काँग्रेस (एम)
झारखंड मुक्ती मोर्चा 0
सीपीआयएम 5
बसपा 4
सीपीआय 2
तेलुगू देसम पार्टी 6
जेडीएस 1
तृणमूल काँग्रेस 13
आम आदमी पक्ष 3
नामनिर्देशित 1
एकूण 113
इतर
बिजू जनता दल 9
वायएसआर काँग्रेस 2
इंडियन नॅशनल लोक दल 1
पीडीपी 2
अपक्ष 2
एकूण 16
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement