एक्स्प्लोर
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं जगाने मान्य केलंय : राजनाथ सिंह
भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचं जगानेही मान्य केलं आहे, असं प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं
नवी दिल्ली : मंदीच्या काळात नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी केला. मात्र भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचं जगानेही मान्य केलं आहे, असं प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं.
भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं वास्तव जगाने मान्य केलं आहे. हे सत्य कुणीही विसरु नये. आर्थिक बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे, असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला.
सिन्हा यांनी नेमकी काय टीका केली आहे?
“पंतप्रधान दावा करतात की, त्यांनी अत्यंत जवळून गरिबी पाहिली आहे. त्याचवेळी, देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचेच अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करतायेत.”, अशी जळजळीत टीका यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींवर केली आहे. शिवाय, “अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची जी अवस्था करुन ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही, तर ते माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याशी धोका केल्यासारखं होईल. मला माहिती आहे, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत.”, असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटलं आहे.
यशवंत सिन्हा यांनी पुढे म्हटलंय की, “खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झाली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात, रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहेत.”
विकास दरातील घसरणीबाबतही यशवंत सिन्हांनी नाराजी व्यक्त करत अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. “पहिल्या तिमाहीत विकास दर घसरुन 5.7 टक्के झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यात सरकारचे प्रवक्ते म्हणतात, नोटाबंदीमुळे मंदी आली नाही. त्यांचं बरोबर आहे. कारण मंदीची सुरुवात आधीच झाली होती. नोटाबंदीने केवळ आगीत तेल ओतण्याचं काम केलं गेलं आहे.”, असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटले आहे.
अर्थमंत्र्यांवर इतकी तिखट टीका करणारे यशवंत सिन्हा कोण आहेत?
यशवंत सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सिन्हा हे अर्थमंत्री होते. ते माजी आयएएस अधिकारी आहेत. यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.
संबंधित बातमी : मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement