सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट - सूत्र
राजस्थान विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री अशोक गहलोत बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. मात्र काँग्रेसचा अंतर्गत वाद अद्यापही संपण्याचं नाव घेत नाहीय.
नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय नाट्याला नवं वळण मिळालं आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे. सचिन पायलट यांच्या भेटीनंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली, अशी माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
राजस्थान विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री अशोक गहलोत बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. मात्र काँग्रेसचा अंतर्गत वाद अद्यापही संपण्याचं नाव घेत नाहीय. सचिन पायलट आणि बंडखोर काँग्रेस नेत्यांशी बातचित याबाबत बोलताना एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने म्हटलं की, आम्ही आधीही म्हटलं होतं आणि आजही म्हणतो की सचिन पायलट आणि इतर बंडखोर नेत्यांनी राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याचा जो प्रयत्न केला, त्याबाबत माफी मागितली तर त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार केला जाईल.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात उघड बंडखोरी करणे आणि संसदीय दलाच्या बैठकीला सहभागी न राहिल्याने काँग्रेसने सचिन पायलट यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन आणि उपमुख्यमंत्री पदावरुन हटवलं होतं. बंडखोरी केल्यानंतर सचिन पायलट यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे की ते मी भाजपमध्ये सामील होणार नाहीत.
सचिन पायलट यांचे समर्थक आमदार अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काम करण्यास इच्छूक नाहीत. राजस्थानमधील राजकीय नाट्यानंतर गेल्या काही आठवड्यापासून काँग्रेसकडून सरकार पडणार नाही, असं सातत्याने सांगितलं जात आहे. अशोक गहलोत यांच्याकडे 100 हून अधिक आमदारांचं समर्थक आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.
संबंधित बातम्या