एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राजस्थानच्या राजकारणातला आज महत्वाचा दिवस, पायलट समर्थक आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

मागील दहा दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात आजचा दिवस महत्वाचा आहे. जयपूरमध्ये सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

जयपूर: मागील दहा दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात आजचा दिवस महत्वाचा आहे. जयपूरमध्ये सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट गटाकडून दाखल याचिकेवर आज निर्णय होऊ शकतो. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने 21 जुलैपच्या सायंकाळी 5:30 पर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करु शकणार नाहीत, असे आदेश दिले होते. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी  नोटीस जारी केली होती. या नोटिशीविरोधात पायलट गेल्या गुरुवारी राजस्थान हायकोर्टात गेले होते. त्यांचा आरोप आहे की, विधानसभा अध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे इशाऱ्यावर काम करत आहेत. यावेळी कोर्टानं सुनावणी पुढं ढकलली होती. कारण पायलट गटाने याचिकेसंदर्भात अभ्यासासाठी वेळ मागितला होता. दरम्यान राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट यांची बाजू मुकुल रोहतगी, हरिश साळवे मांडत आहेत. तर अभिषेक मनु सिंघवी हे गहलोत सरकारची बाजू मांडत आहेत. गुरुवारी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली होती. त्यात, सुधारित याचिका सादर करण्यासाठी पायलट गटाच्या वतीने साळवे यांनी वेळ मागून घेतला होता. राजस्थान काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना सचिन पायलट यांच्यासह त्यांचे 18 समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी मानून पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली. त्याला पायलट गटाने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि काँग्रेस सदस्य म्हणून मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. भाजपमध्ये जाणार नाही- पायलट राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं होतं. सचिन पायलट म्हणाले होते की, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझी रणनीति तयार करत आहे. काही लोकांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या असल्याचं पायलट म्हणाले होते. दरम्यान राजस्थान विधानसभा अध्यक्षांकडून सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना नोटिस पाठवण्यात आली आहे. त्यात आज, 17 जुलैपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचं सांगितलं आहे. पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यता रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसकडून नोटिस पाठवली आहे. दोन दिवसात या नोटिशीला उत्तर देण्याबाबत सांगितलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार पायलट नवीन पक्षाची स्थापना देखील करु शकतात. 'भाजपमध्ये जाणार नाही, काही लोकांनी अफवा पसरवली' : सचिन पायलट सचिन पायलट यांना हटवल्यानंतर राजीनामास्त्र सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर एनएसयूआय प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु पूनिया यांनी राजीनामा दिला. तसेच टोंकमध्ये लक्ष्मण सिंह गाता यांच्यासह 59 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. पाली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चुन्नीलाल चादवास यांनीही राजीनामा दिला आहे. सचिन पायलट यांच्यावर अखेर कारवाई, राजस्थानचं कुठल्या वळणावर जाणार राजकारण सचिन पायलट यांचं ट्वीट पायलट यांनी ट्वीट करत त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. "मला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो. राम राम सा. सत्य परेशान होऊ शकत मात्र पराजित नोही होऊ शकत, असं पायलट यांनी म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget