एक्स्प्लोर

Rajasthan Political Crisis : काँग्रेसमधील कलह कायम, सचिन पायलट घेणार आज सोनिया गांधी यांची भेट, गेहलोत यांचीही दिल्लीवारी

Congress Crisis : आज सचिन पायलट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही दिल्ली दरबारी दाखल होणार आहेत.

Rajasthan Political Crisis : काँग्रेसमधील (Congress) कलह कायम असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress National President) लवकरच निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात अनेक हालचाली होताना दिसत आहेत. काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) मंगळवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. सचिन पायलट आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहे. तर अशोक गेहलोत हे ही सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. रविवारी राजस्थानमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकली नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थकांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. अनेक आमदारांनी आपले राजीनामे सभापती सीपी जोशी यांच्याकडे सुपूर्द केले. यावर कडकपणा दाखवत काँग्रेसच्या पदश्रेष्ठींनी तीन नेत्यांना नोटीस बजावली आहे.

काँग्रेस आमदारांना हायकमांडची नोटीस

सचिन पायलट मंगळवारी दुपारी दिल्लीला पोहोचले. विमानतळावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. राजस्थानमधील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करुन दिल्लीत परतलेले काँग्रेसचे पर्यवेक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचा लेखी अहवाल सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय शांती धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांच्यावर रविवारी पक्षाने शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने तीन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देत राजस्थान सरकारमधील मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी म्हटलं की, 2020 मध्ये मानेसरला गेलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी होती. सोनिया गांधी यांचा निर्णय मान्य करण्यास आमदार तयार आहोत. आम्हाला आमच्याच लोकांशी लढायचे नाही. धारीवाल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मुद्दे मांडले असतील तर पक्षाने त्यात लक्ष घालायला हवं. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या उमेदवारीचा निर्णय सोनिया गांधी यांच्याकडे आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोपAnjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानियाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget