एक्स्प्लोर
रेल्वेत लोअर बर्थसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता
मुंबई : रेल्वेच्या स्लीपर डब्ब्यात लोअर बर्थ बुक करायचा असेल तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. तेही थोडेथोडके नाही तर 50 ते 100 रुपये जास्त. कारण रेल्वे प्रशासन लवकरच हे नवं धोरण आणण्याच्या तयारीत आहे.
तिकीट बुक करताना प्रवाशांना बर्थचा पर्याय निवडावा लागतो. यावेळी प्रवासी लोअर बर्थ निवडतात. महिला वर्ग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थला प्राधान्य देतात. चार्ट बनवताना रेल्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतात.
लोअर बर्थच्या याच वाढत्या मागणीनुसार त्यावर अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास आता मूळ तिकीटासोबतच अतिरिक्त 50 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवताना दिसतं. हा देखील त्याचाच एक भाग आहे. पण महिला, गरोदर माता आणि ज्येष्ठांसाठी हा निर्णय जुलमी ठरु शकतो.
रेल्वे मंत्रालयानुसार, जर लोअर बर्थसाठी अतिरिक्त रुपये वसूल केले तर लोकांची मागणी कमी होईल, परिणामी लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement