एक्स्प्लोर
रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीत सामावून घ्या, हमालांचा देशव्यापी संप
सरकारने लवकरात लवकर आम्हाला रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीत सामावून घेण्याची मागणी हमालांनी केली आहे.

कल्याण : रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या हमलांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. हमालांना रेल्वेत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून सामावून घ्या, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
बदलत्या जीवनशैलीनुसार वापरात आलेल्या ट्रॉली बॅग्स, रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेले सरकते जिने, लिफ्ट यामुळे हमालांना आपलं सामान वाहून न्यायला सांगण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याचा सरळ फटका हमालांच्या उत्पन्नाला बसला असून त्यामुळे घर चालवायचं कसं? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
या हमालांमध्ये अनेक जण उच्चशिक्षित असून काहींची मुलं उच्चशिक्षण घेत आहेत. केवळ दुसरी नोकरी नाही, म्हणून त्यांनी हे काम पत्करलं आहे. मात्र आता इथेही पदरी निराशा येऊ लागल्यानं आम्ही जगावं की मरावं? असा उद्विग्न प्रश्न हमालांनी विचारला आहे.
सरकारने लवकरात लवकर आम्हाला रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीत सामावून घेण्याची मागणी हमालांनी केली आहे. हमालांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांना आज काहीसा त्रास झाला असला, तरी हमालांच्या मागण्यांचं प्रवाशांनीही समर्थन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
