वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याचा संदर्भत देत प्रशांत किशोरांचा भाजपला सल्ला, म्हणाले...
Rahul Gandhi Row : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi Row : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील भाषाणाचा उल्लेख करत प्रशांत किशोर यांनी भाजपला टोला लगावला आहे. प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये 'जन सुराज' यात्रा करत आहेत, यावेळी त्यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली, त्यावर प्रतिक्रिया दिली. न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करतोय, पण दोन वर्षाची शिक्षा जास्त आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.
राहुल गांधींच्या प्रकरणावर प्रशांत किशोर यांनी भाजपला टोला लगावला. ते म्हणाले की, 'न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करतो, पण राहुल गांधींना झालेली दोन वर्षांची शिक्षा जास्त आहे. राजकारणात एकमेंकाविरोधात अशी टिका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप केले जातात. भाजपने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या पंक्ती "छोटे मन से कोई बड़ा नहीं होता" आठवायला हव्यात. भाजपने मोठं मन दाखवायला हवे.'
न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करतो -
प्रशांत किशोर म्हणाले की, 'राहुल गांधींच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा जास्त आहे. राजकारणात अथवा प्रचारात नेते एकमेंकावर टीका टिप्पणी करत असतात. आरोप प्रत्यारोप होत असतात.. अशा प्रकराची घडलेली घटना पहिली नाही अन् अखेरचीही नाही.' न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करतो, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
कोणत्या लढाईत आहे, हेच काँग्रेसला माहीत नाही -
काँग्रेसला सल्ला देताना प्रशांत किशोर म्हणाले की, 'कोणती लढाई लढत आहे, हेच काँग्रेसला माहित नाही. फक्त दिल्लीत संसदेपर्यंत मार्च करणे आणि ट्वीट करण्यापर्यंत लढाई लढू शकत नाही. ही लढाई लढायची असल्यास गाव खेड्यात, रस्त्यावर उतरावे, प्रत्येक ठिकाणी पोहचावे लागेल. काल मी 20 किमी चाललो, त्यावेळी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अथवा सदस्य गावात राहुल गांधींसाठी आंदोलन करताना दिसला नाही. विरोधी पक्षांमधील लढत निवडणुकीच्या निकालात दिसून येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेणार नाही.'
पाहा वाजपेयी, काय म्हणाले होते? -
मोदी आडनावावर टिप्पणी केलेल्या प्रकरणात सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर देशभरात आंदोलन करण्यात आली. भाजपकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केले.
आणखी वाचा :
खासदारकी रद्द झाल्यानंतर इंदिरा गांधींनी केले होते दमदार पुनरागमन, आजीसारखा करिश्मा राहुल गांधी करणार का?