एक्स्प्लोर

राहुल गांधींकडून 'डीआरडीओ'चं अभिनंदन, तर मोदींना 'वर्ल्ड थिएटर डे'च्या शुभेच्छा

अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

नवी दिल्ली : भारताने अंतराळ क्षेत्रात आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अंतराळातील यशस्वी कामगिरीबद्दल 'डीआरडीओ'च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "वेल डन डीआरडीओ, तुमच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे." ट्वीटमध्ये राहुल गांधींनी हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण राहुल गांधीनी मोदींचं अभिनंदन करण्याऐवजी त्यांना 'वर्ल्ड थियएटर डे' (जागतिक रंगभूमी दिन) च्या शुभेच्छा दिल्या.

भाजप सरकारच्या कार्यकाळात आज वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात हे यश संपादित केलं आहे. मात्र भारतातील संरक्षण क्षेत्राचा पाया पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वात काँग्रेसने रचला असल्याचं काँग्रेसने दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 1962 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वात अंतराळातील कार्यक्रमांची रुपरेषा आखली गेली होती, असंही काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मिशन शक्ती'ची माहिती देशातील नागरिकांना दिली. मोदी  म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."

"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या 

अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Embed widget