(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील लॉकडाऊन फेल; राहुल गांधी यांची ट्विटर वर ग्राफ शेअर करत पुन्हा टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लॉकडाऊन वरुन केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ट्विटर वर एक ग्राफ शेअर करत त्यांनी लॉकडाऊन फेल झाल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ग्राफ पोस्ट करुन देशातील लॉकडाऊन उठवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या ग्राफमध्ये स्पेन, जर्मनी, इटली आणि युके या देशांशी भारताची तुलना केली आहे.
देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधितांचा देशातील आकडा आता दोन लाखाच्याही वर गेला आहे. अशातच केंद्र सरकारने अनलॉक 1 म्हणत लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना असे करणे घातक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज एक ट्विट करत आपला लॉकडाऊन कसा अयशस्वी असल्याचे उदाहरण ग्राफ मधून दिले आहे. स्पेन, जर्मनी, इटली आणि युके या देशांनी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथील केले आहेत. मात्र, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राहुल गांधी यांना सांगायचे आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांवर; आज 1475 रुग्ण कोरोनामुक्तThis is what a failed lockdown looks like. pic.twitter.com/eGXpNL6Zhl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 5, 2020
लॉकडाऊनमध्ये अनेक चुका आपण कठीण लॉकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये अनेक चुका होत्या. यामुळं आपल्याला दोन्ही बाजूंनी नुकसानच झालं. आता आपण या व्हायरसच्या संकटापासून सावरु शकलो नाहीत. मात्र, यासोबत अर्थव्यवस्था मात्र कोलमडून पडली आहे, असं उद्योगपती राजीव बजाज यांनी म्हटलं आहे. मला वाटतं लोकांच्या डोक्यातून भीती काढण्याची आधी गरज आहे. यासाठी विचार स्पष्ट असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजीव बजाज यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बजाज म्हणाले की, खूप लोकं महत्वाच्या गोष्टी बोलायला घाबरत आहेत. अशा काळात आपल्याला सहिष्णू आणि संवेदनशील राहून भारतात काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
कोरोनाला रोखण्यासाठीचे लॉकडाऊन वाया गेले : राहुल गांधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल बजाज यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारसोबत, राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांना फोन