एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँकिंगच्या इतिहासात पंजाब नॅशनल बँकेला सर्वात मोठा तोटा
मुंबई : बॅंकिंगच्या इतिहासात पंजाब नॅशनल बॅंकेला सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत बॅंकेला तब्बल 5 हजार 367 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची माहिती आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत बॅंकेला 306 कोटी रुपयांचा नफा झाला होता. थकित कर्जांचं प्रमाण आवाक्याबाहेर गेल्यामुळे बॅंकेला तोटा सहन करावा लागला आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बॅंकेला तोटा झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
गेल्या आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीत बॅंकेला 306.56 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सध्या बँकेच्या उत्पन्नामध्ये 1.33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचवेळी बॅंकेच्या थकित कर्जांमध्ये तीनपट वाढ झाली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या थकित कर्जांचा आकडा 10 हजार 485.23 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
Advertisement