एक्स्प्लोर

गिरीप्रेमीने इतिहास रचला, माऊंट कांचनजुंगा मोहीम फत्ते

गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखराची चढाई केली.

पुणे : गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला आहे. या मोहीमेदरम्यान गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांसह 30 आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांनी माऊंट कांचनजुंगावर चढाई केली. आज (15 मे) सकाळी दहाच्या सुमारास गिर्यारोहकांनी शिखर सर केलं. कांचनजुंगा इको इक्स्पेडिशन 2019 ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम आहे. एकाच दिवशी 30 गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर एकाच दिवशी चढाई करणं हा नवा विक्रम आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी 2012 मध्ये माऊंट एव्हरेस्ट, 2013 मध्ये माऊंट ल्होत्से, 2014 मध्ये माऊंट मकालू, 2016 मध्ये माऊंट धौलागिरी आणि माऊंट च्यो ओयु आणि 2017 मध्ये माऊंट मनास्लुवर मोहीम फत्ते केली होती. अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक मोहीम नेते आहेत. आंतरराष्ट्रीय मोहिमेचे बेस कॅम्पवरुन नेतृत्व आणि संयोजन झिरपे यांनी केलं. गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखराची चढाई केली. ज्येष्ठ गिर्यारोहक माया शेर्पा आणि सिंगापूरचे खु स्वी चाऊ यांनीही उमेश झिरपे यांच्या मोहिमेदरम्यान शिखर चढाई केली होती. कसं आहे माऊंट कांचनजुंगा शिखर? उंची : 8586 मीटर माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट K2 नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर भारतातील सर्वात उंच शिखर हे शिखर भारत आणि नेपाळच्या सीमेवर आहे कांचनजुंगाची पाच शिखरं मुख्य शिखर : 8586 मीटर पश्चिम शिखर : 8505 मीटर मध्य शिखर : 8482 मीटर दक्षिण शिखर : 8494 मीटर कांगबाचेन शिखर : 7903 मीटर चढाईचे मार्ग भारतीय बाजूचा मार्ग : कांचनजुंगा आणि झेमू ग्लेशियरच्या बाजूने (सध्या बंद) नेपाळच्या बाजूचा मार्ग : यालुंग ग्लेशियरच्या मार्गे (गिरीप्रेमीच्या संघाने याच मार्गाने चढाई केली) चढाईतील आव्हानं नेपाळ बाजूच्या यालुंग ग्लेशियर मार्गे चढाई करण्यात येते बेसकॅम्पची उंची : 5475 मीटर कॅम्प 1 ची उंची : अंदाजे 6000 मीटर कॅम्प 2 ची उंची : अंदाजे 6300 मीटर कॅम्प 3 ची उंची : अंदाजे 6900 मीटर कॅम्प 4 ची उंची : अंदाजे 7500 ते 7700 मीटर बेसकॅम्प ते कॅम्प 1 मार्ग : तीव्र बर्फाळ रिज कॅम्प 1 ते कॅम्प 2 मार्ग : ब्लू आईस (टणक बर्फ ज्यावरुन चालणं आणि चढाई करणे अत्यंत अवघड) तसंच 100 मीटरची बर्फाची 70 ते 80 अंश कोनातील उभी भिंत कॅम्प 2 ते कॅम्प 3 : दगडी भिंती, चढाई मोहिमेतील सर्वाधिक मृत्यू याच टप्प्यात कॅम्प 3 ते कॅम्प 4 : प्रचंड हिमभेगा, सतत हालचाल होणारा भाग कॅम्प 4 ते शिखरमाथा : कॅम्प 4 ते शिखरमाथा ते पुन्हा कॅम्प 4 हा प्रवास तब्बल 24 ते 27 तासांचा, अत्यंत थकवणारा, माऊंट एव्हरेस्टवर याच टप्प्यांमध्ये चढाई - उतराईसाठी तुलनेने कमी म्हणजे 14 ते 17 तास लागतात.

महत्त्वाच्या बातम्या

Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

Embed widget