एक्स्प्लोर

गोव्याच्या प्रियव्रत पाटीलने रचला इतिहास; सोळाव्या वर्षी 'महापरीक्षा' उत्तीर्ण

प्रियव्रतचे वडील पं. देवदत्त पाटील हे न्यायशास्त्र व व्याकरण या दोन्ही शास्त्रांतील प्रकांडपंडित असून ते गोव्यात रिवण या गावात निवासी पाठशाळा चालवतात. विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करतात. विशेष म्हणजे जातीभेदाच्या भिंती तोडून सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना शास्त्राचे शिक्षण देतात.

पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.

तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते. "प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

"काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला", असं ट्वीट चामू कृष्णाशास्त्री यांनी करुन पंतप्रधान मोदींना त्यात टॅग केल होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.

महापरीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या गुरुसोबत देशाच्या विविध भागात राहतात आणि पारंपारिक 'गृह गुरुकुल' प्रणालीनुसार शिक्षण घेतात. वर्षातून दोनदा सर्व गुरु व विद्यार्थी त्यांच्या लेखी व तोंडी परीक्षेसाठी तेनाली येथे एकत्र येतात. विद्यार्थ्यांच्या 5 ते 6 वर्षांच्या अभ्यासानंतर कांची मठाच्या देखरेखीखाली महापरीक्षा' घेतली जाते. गेल्या 40 वर्षांमध्ये, 'तेनाली परीक्षा' शास्त्र अभ्यासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था ठरली आहे. 'इंडिक अकादमी' सध्या विविध शास्त्राच्या अभ्यासासाठी 40 विद्यार्थ्यांना मदत करत आहे.

प्रियव्रत सध्या तेनाली येथे असून आज तो महागुरुंचे आशीर्वाद घेण्यासाठी आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथे जाणार आहे. तेथून सोलापूर येथे जाऊन 12 सप्टेंबर नंतर गोव्यात परतणार आहे. तेनाली येथून प्रियव्रतच्या यशाबद्दल बोलताना त्याची आई अपर्णा पाटील म्हणाल्या, प्रियव्रत व्याकरण शास्त्राची महापरीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. चेन्नई येथे कांची शंकराचार्य पीठातर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दोन विख्यात महापंडितांनी सलग दीड तास प्रश्नांच्या अथक फैरी झाडल्या आणि प्रियूने त्याला यशस्वी उत्तरे दिली. महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा अतिशय कमी वयात उत्तीर्ण होणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. संस्थेच्या 100 ते 150 वर्षाच्या इतिहासाचा धांडोळा घेऊन संस्था संचालकांनी मला हे सांगितले. या त्याच्या यशाबद्दल कांचीमठाने महावस्त्र एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन त्याचे कौतुक केले आहे.

प्रियव्रतचे वडील पं. देवदत्त पाटील हे न्यायशास्त्र व व्याकरण या दोन्ही शास्त्रांतील प्रकांडपंडित असून ते गोव्यात रिवण या गावात निवासी पाठशाळा चालवतात. विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करतात. विशेष म्हणजे जातीभेदाच्या भिंती तोडून सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना शास्त्राचे शिक्षण देतात. ज्ञानदानाचं शुल्क घेणार नाही, असं वचन त्यांच्याकडून घेतल्यावरच त्यांच्या गुरुंनी त्यांना शास्त्र शिकवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget