एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज ठरणार?
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार का? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
काही जाणकार पत्रकारांनी मात्र राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा आजच होण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु भाजपकडून याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपचाच उमेदवार असेल, असं भाजपच्या सुत्रांनी सांगितलं आहे. आपल्याच पक्षाचा व्यक्ती बसवण्यासाठी भाजपला नाममात्र मतांची गरज आहे. त्याचीच गोळाबेरीज कशी होणार, यावर चर्चा होण्याचा अंदाज आहे.
येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर एनडीएचा उमेदवार कोण असर, यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रपतीपदासाठी ही नावं चर्चेत
मेट्रोमॅन - ई श्रीधरन
लोकसभा अध्यक्षा - सुमित्रा महाजन
झारखंडच्या राज्यपाल - द्रौपदी मुर्मू
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री - थावरचंद गहलोत
परराष्ट्र मंत्री - सुषमा स्वराज
भाजपचे ज्येष्ठ नेते - लालकृष्ण अडवाणी
संबंधित बातम्या
सुमित्रा महाजन, ई श्रीधरन राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडीसाठी भाजपची 3 मंत्र्यांची समिती
शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नाहीत: प्रफुल्ल पटेल
राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल वाजलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
Advertisement