एक्स्प्लोर

Nashik Crime Uddhav Nimse : हत्याप्रकरणातील फरार भाजप नेत्याचा देवदर्शनाचा सपाटा; गुवाहाटी, तिरुपती बालाजी अन्...; पोलिसांना गुंगारा देत कुठे-कुठे फिरला?

Nashik Crime Uddhav Nimse : नांदूर नाका परिसरात घडलेल्या राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे 20 दिवसांपासून फरार होता.

Nashik Crime Uddhav Nimse : नांदूर नाका परिसरात घडलेल्या राहुल धोत्रे (Rahul Dhotre Case) हत्याकांड प्रकरणात तब्बल 20 दिवस फरार असलेला भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे (Uddhav Nimse) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. विशेष म्हणजे, फरार असताना निमसेने राजस्थान, गुवाहाटी, तिरुपती बालाजी अशा देशभरातील प्रमुख देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. मात्र न्यायालयीन दणक्यांनंतर निमसेने स्वतःहून पोलिसांसमोर हजेरी लावली आणि लगेचच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

22 ऑगस्ट रोजी नाशिकच्या नांदूर नाका परिसरात दुचाकीचे चाक पायावर गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे यांच्यात वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला आणि त्यानंतर जमाव गोळा झाला. जमावाने राहुल धोत्रे आणि त्याचा मित्र अजय कुसाळकर यांच्यावर लाकडी-लोखंडी दांडके आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या राहुलचा 29 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उद्धव निमसेसह 10 ते 15 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र मुख्य आरोपी उद्धव निमसे घटनेनंतर फरार झाला होता.

पोलिसांना गुंगारा देत कुठे-कुठे फिरला?

फरार असताना उद्धव निमसे गुप्त ठिकाणी लपून फिरत होता. पोलिसांच्या चार पथकांकडून देशभर शोध घेतला जात असताना तो चकवा देत गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुवाहाटी आणि तिरुपती बालाजी येथे फिरत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता, ट्रॅव्हल बसद्वारे प्रवास करत, देवदर्शनाच्या निमित्ताने तो पोलीस तपासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. गुजरातमधील एका एअरपोर्टवर त्याचा ड्रायव्हर शेवटचा संपर्कात आल्याची माहितीही समोर आली आहे.

न्यायालयीन झटका आणि शरणागती

उद्धव निमसेने जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र दोन्ही ठिकाणी अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयीन निर्णयानंतर पोलिसी दबाव वाढल्याने अखेर 15 सप्टेंबर रोजी तो अचानक पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांनी लगेच त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली.  आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सुनावणीत सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष कोणती बाजू मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पोलीस तपासावर होते प्रश्नचिन्ह

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना 20 दिवस उद्धव निमसेचा थांगपत्ता न लागल्यामुळे पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आरोपी मोकाट फिरत असताना पोलिसांची विश्वासार्हता धक्क्यात आली होती. मात्र आता निमसेच्या आत्मसमर्पणामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा 

अनैतिक संबंधाचा संशय, अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या नवऱ्याचा प्रियकरानं काटा काढला, नाशकात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..

व्हिडीओ

Delhi Blast :Pakistan मधील कुरापती, बहावलापूरच्या जैशच्या मुख्यालयात दहशतवाद्यांची गुप्त बैठक -सूत्र
Delhi Blast Probe: 'आत्मघाती हल्ला नाही, घाबरून कच्च्या स्फोटकांचा स्फोट', NIA सूत्रांची माहिती
Delhi Blast : जैशच्या फरिदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाईंड अम्मार अल्वी?, यंत्रणांकडून कसून तपास
Delhi Blast Probe: लाल किल्ला स्फोटामागे डॉक्टर मॉड्यूल? J&K मधून Dr. Tajamul ताब्यात, आकडा 6 वर
Terror Module घटस्फोटानंतर संबंध नाही, Delhi स्फोटातील Dr. Shaheen च्या पूर्वाश्रमीच्या पतीचा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Embed widget