एक्स्प्लोर
प्रवीण तोगडिया आज नवी संघटना स्थापन करणार
अहमदाबादेत ते आज सकाळी आपल्या नव्या संघटनेचं नाव जाहीर करतील. ही संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे.
अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिक आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रवीण तोगडिया हे नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याची माहिती मिळते आहे.
अहमदाबादेत ते आज सकाळी आपल्या नव्या संघटनेचं नाव जाहीर करतील. ही संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे.
14 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. प्रसंगी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वावरही आपला निशाणा साधण्याचे सोडले नाही.
कोकजे सध्या विहिंपचे अध्यक्ष
विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत. विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.
तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement