Bihar Politics : बिहारमध्ये आणखी उलथापालथ होणार, प्रशांत किशोर यांचं भाकित, नितीश कुमारांवर निशाणा
बिहारमधील राजकीय घडामोडींवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये आणखी उलथापालथ होणार असल्याचे भाकित प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केलं आहे.
Prashant Kishor : नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवत भाजपची साथ सोडली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलासोबत (Rashtriya Janata Dal) सत्ता स्थापन केली. आता बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झालेत, तर तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) हे उपमुख्यमंत्री आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये आणखी उलथापालथ होणार असल्याचे भाकित प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केलं आहे. यावेळी किशोर यांनी नवीन स्थापन झालेल्या सरकारवर जोरदार निशाणा साधला.
...तर नितीश कुमारांशी वादविवाद न करता नेता म्हणून स्वीकार करेन
बिहारमध्ये घडणाऱ्या अलीकडच्या राजकीय बदलांवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यंनी भाष्य केलं आहे. आगामी काळात उलथापालथ होणार असल्याचे भाकित प्रशांत किशोर यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या 10 लाख नोकऱ्यांच्या दाव्यावर देखील किशोर यांनी टीका केली आहे. नितीश कुमार यांनी येत्या दीड वर्षात 5 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या तर मी माझा प्रचार सोडेन आणि त्यांच्याशी वादविवाद न करता माझा नेता म्हणून त्यांना स्वीकार करेन असेही प्रशांत किशोर यावेळी म्हणाले. 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचा मार्ग असल्याचे किशोर म्हणाले. एवढ्या नोकऱ्या कोठून आणणार असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ज्या लोकांना तुम्ही काम दिले आहे, त्यांना गेल्या सहा महिन्यांचा पगार तुम्ही देऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले.
बिहारमध्ये राजकारण 180 अंशांनी फिरले
'जन सुरज अभियाना'च्या संदर्भात दोन दिवसांच्या दौऱ्यावर प्रशांत किशोर समस्तीपूरला आले आहेत. यावेळी त्यांनी पाटोरी येथील नांदणी हायस्कूल मोहिउद्दीननगर येथील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यानंतर समस्तीपूर शहरातील ताजपूर रोड येथे जनतेच्या भेटीगाठी घेत त्यांनी जन सूरजवर नगर परिषदेच्या सदस्यांशी देखील संवाद साधला. बिहारचे राजकारण 180 अंशात फिरले आहे. आता पुढे किती अंश फिरणार हे कोणालाच माहीत नाही. फिरु द्या, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
नितीश कुमार खुर्चीवर फेव्हिकॉल लावून बसलेत
नितीश कुमार यांना जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. नितीश कुमार हे खुर्चीवर फेव्हिकॉल लावून बसले आहेत. नितीश जी जिंदाबाद आहेत पण त्यांच्यामुळे संपूर्ण बिहारची दुर्दशा झाली असल्याचा आरोप यावेळी प्रशांत किशोर यानी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: