एक्स्प्लोर

फिर एक बार, 'महागठबंधन' सरकार! नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

Nitish Kumar New Chief Minister Of Bihar : बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधन सरकार. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान.

Nitish Kumar Takes Oath As Bihar New Chief Minister : भाजपशी (BJP) काडीमोड घेतल्यानंतर जेडीयूने (JDU) पुन्हा राजदशी (RJD) संसार थाटलाय. आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपला 'दे धक्का' घेतल्यानं तिथलं जेडीयू-भाजप सरकार काल कोसळलं. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ घेत महागठबंधन सरकारची सत्ता बिहारमध्ये आणली आहे. नितीश कुमार यांच्या भूमिकेनं बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमधली सत्ता मात्र गमवावी लागली आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणतंच चित्र स्पष्ट नाही. बिहारमधील महागठबंधनमध्ये जेडीयू, राजद, काँग्रेस, हम आणि वाम दल यांचा समावेश आहे. 

शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित 

शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब राजभवनात उपस्थित होतं. त्यात राबडी देवी, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राहेल यादव यांचा समावेश आहे. अन्य कोणत्याही पक्षाच्या किंवा राज्यातील बड्या नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. तसेच, लालू प्रसाद यादव मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir: राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Vaibhav Sooryavanshi Post Viral : आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
Embed widget