एक्स्प्लोर

मोदी-नितीश... ये रिश्ता क्या कहलाता हैं!

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलावलं तर ते आले नाहीत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावल्यावर मात्र अगदी धावत दिल्लीत आले. नितीशकुमारांचं नेमकं चाललंय तरी काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार मोदींच्या बाजूनं जास्त झुकत चालले असून ते कुठल्याही क्षणी एनडीएत पुन्हा प्रवेश करतील असेही अंदाज व्यक्त केले जात आहेत. मोदींकडून नितीशकुमारांना खास आमंत्रण काल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत बोलणी करण्यासाठी सोनियांच्या निमंत्रणावरुन 17 विरोधी पक्ष दिल्लीत पोहचले होते. आले नव्हते ते केवळ नितीशकुमारच. जेडीयूच्या शरद यादव, केसी त्यागी या इतर नेत्यांना त्यांनी पाठवलं खरं. पण काल व्यस्ततेची जी अनेक कारणं ते सांगत ते अनुपस्थित राहिले, ती मोदींच्या आमंत्रणावर मात्र गायब झाली. मालदीवचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या स्वागताखातर मोदींनी दिलेल्या या स्नेहभोजनाला नितीश यांना खास आमंत्रण होतं. पण प्रश्न फक्त राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर यूपीएची साथ सोडण्यापुरता नाही. 2014 आधी ज्या नितीशकुमार- नरेंद्र मोदींमध्ये विस्तवही जात नव्हता, तेच आता गळ्यात गळे घालून एकमेकांची स्तुती करत आहेत. बिहारमधल्या दारूबंदीच्या निर्णयाची मोदींनी जाहीरपणे स्तुती केली होती. लालूंशी मैत्री गळ्यातलं लोढणं? नितीशकुमार हे आधी एनडीएमध्येच होते. 2012 पर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा भाजपनं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना घोषित केलं. त्यानंतर मात्र महत्वकांक्षी नितीशकुमार यांचा तिळपापड झाला. शिवाय त्यांना आपली सेक्युलर इमेज टिकवण्यासाठी मोदींसारख्या कट्टर चेहऱ्याला विरोध करणं भाग होतं. त्यासाठीच प्रसंगी लालूंशी मैत्री करुन त्यांनी बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवली. पण बिहारमध्ये सध्या लालूंची साथ ही नितीशकुमारांची डोकेदुखी ठरलीय. उठताबसता लालूंच्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी नितीश यांच्या इमेजवरही शिंतोडे उडतायत. नितीशकुमार किमान स्वबळावर बिहारमधे निवडून आले असते तरी त्यांना मोदींना विरोध करणं सोपं गेलं असतं. पण लालूंची साथ हे त्यांच्या गळ्यातलं लोढणंच बनलं आहे. नितीशकुमारांची तडजोडवादी भूमिका? काही दिवसांपूर्वीच 2019 साठी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये मी नसणार, माझा पक्ष छोटा आहे असं विधान नितीशकुमारांनी केलं होतं. मोदींच्या विरोधात 2019 साठी राहुल, ममता यांच्याशिवाय ज्यांना प्रमुख चेहरा म्हणून पाहिलं जातं, त्या नितीशकुमारांनी हे विधान करणं म्हणजे एकप्रकारे शरणागती पत्करल्याचंच लक्षण होतं. कदाचित मोदींना विरोध करून आणखी काही गमावण्याऐवजी त्यांना स्वीकारून किमान बिहार तरी आपल्या हातात कायम राहील अशी तडजोडवादी भूमिका त्यांनी पत्करल्याचा निष्कर्ष यातून काढता येतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Rohit Pawar : रोहितची नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी, शरद पवारांकडून संकेतसकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :29 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 29 September 2024MNS Candidate vs Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात राज ठाकरे देणार उमेदवार,कुणाच्या नावाची चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Embed widget