एक्स्प्लोर
Advertisement
पंतप्रधान मोदी ऑनड्युटी 18 तास, अडीच वर्षात एकही सुट्टी नाही
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसाचे 18 तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करत असतात. कधीही सुट्टी न घेता, आरामावर वेळ न दवडता मोदी सतत कार्यरत असतात. आरटीआयमध्ये विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे.
26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी स्वतःला देशाचा प्रधानसेवक संबोधलं. संविधानानुसार प्रधानसेवक असं कोणतंही पद नाही, मात्र मोदी देशाला दिलेलं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकाही दिवसाची सुट्टी घेतलेली नाही.
आरटीआय कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे देशाच्या पीएमच्या सुट्ट्यांच्या नियमावलीबाबत माहिती मागितली होती.
पीएमओचं उत्तर :
'माजी पंतप्रधानांच्या सुट्ट्यांबाबत सध्याच्या कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नाही. मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. पंतप्रधान प्रत्येक क्षणी काम करत असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरु नये'
मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दिनक्रमाचीही चर्चा व्हायला लागली. 28-29 सप्टेंबरच्या रात्री जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला, तेव्हा मोदींनी अख्खी रात्र जागून काढली आणि पाण्याचा घोटही न प्यायल्याचं म्हटलं जातं.
ओबामांकडून कौतुक :
नरेंद्र मोदी 24 पैकी 18 तास काम करत असतात. साधारण 5 तासांची झोप ते घेतात. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर त्यांचा दिनक्रम सुरु होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोदींच्या दिनचर्येची चर्चा जगभरात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनीही मोदी आपल्यापेक्षा कमी काळ झोप घेत असल्याचं म्हटलं होतं.
योगाचा फायदा :
पंतप्रधान मोदी दररोज योग करतात. योग केल्यामुळे थकवा, झोप, तहान-भूक यावर त्यांनी एकप्रकारे विजय मिळवला आहे. नवरात्रीच्या काळातही ते फक्त पाणी पिऊन उपवास करतात. हे त्यांच्या सुदृढ तब्येतीचं रहस्य असल्याचं म्हटलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement