PM Modi Gujarat Visit : नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे शंभरीत पदार्पण, वाढदिवसादिवशी मोदी घेणार भेट
PM Modi Mother Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
![PM Modi Gujarat Visit : नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे शंभरीत पदार्पण, वाढदिवसादिवशी मोदी घेणार भेट pm narendra modi will meet his mother heeraben modi on june 18 to celebrate her 100th birthday PM Modi Gujarat Visit : नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे शंभरीत पदार्पण, वाढदिवसादिवशी मोदी घेणार भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/e41603c630d2c8cd8eea032928e6d95b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi Mother Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दिवशी त्यांची आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचा वाढदिवस आहे. गांधीनगर (Gandhinagar) येथील घरी त्यांचा 100 वा वाढदिवस (PM Modi Mother Birthday) साजरा केला जाणार आहेत. या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वडनगर (Vadnagar) येथील हाटकेश्वर मंदिरात (Hatkeshwar Temple) पूजेचं आयोजन करण्यात आलेय. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. त्याशिवाय पीएम मोदी पावागढमध्ये 'काली माता' मंदिरात ध्वजारोहणही करणार आहेत.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, 18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वडोदरातील एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी 4 लाख लोकांना संबोधित करणार आहेत. पीएम मोदींचा हा कार्यक्रम जवळच्या सरदार इस्टेटच्या कुष्ठरोग रुग्णालयात होणार आहे.
दरम्यान, 11 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आईची भेट घेतली होती. त्यावेळी ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर पंतप्रदान नरेंद्र मोदी आईला भेटले होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जात आहेत. आई हिराबेन यांच्या वाढदिवसाला ते उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या गुजरात दौऱ्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
महिन्यात दोन वेळा गुजरात दौऱ्यावर -
जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर जात आहेत. याआधी 10 जून रोजी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. आता 18 जून रोजी ते पुन्हा गुजरातच्या दौऱ्यावर जात आहे. पुढील काही दिवसांत गुजरातच्या निवडणूका होणार आहेत, त्या पार्श्वभूमिवर मोदींच्या गुजरात दौऱ्याला महत्व आलेय. 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामाचं उद्धघाटन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावेळी नवसारीच्या आदिवासी भागात 3,050 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. याशिवाय पाणीपुरवठा सुधारण्याच्या उद्देशाने इतर 14 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी केली होती.
कार्यक्रमाची जोरदार तयारी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यक्रमस्थळी जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर खास अशा घुमटाची सोय करण्यात आली आहे. पार्किंगची सोय करण्यात आली होती. तसेच लायटिंग आणि इतर अनेक सुविधांवर काम सुरु आहे. तसेच आपतकालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैदकीय पथकही तैणात करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)