पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल, आसामच्या दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि आसाम राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.यावेळी ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये यंदा विधानसभेची निवडणूक होणार आहे. ममतांचा गड भेदण्यासाठी भाजप रणनीती आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगाल दौर्यावर येणार आहेत. यासह पंतप्रधान मोदींचा आसाम दौरादेखील एकत्र असणार आहे. यावेळी मोदी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील प्रमुख पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी करतील. या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आसाममध्ये 'असोम माला' कार्यक्रम सुरू करणार असून दोन रुग्णालयांची पायाभरणी करतील.
पीएम मोदी यांनी ट्वीट केले की, 'मी उद्या आसाममधील लोकांमध्ये असेल. सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे 'असोम माला' कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे राज्याच्या रस्ते पायाभूत सुविधांना चालना मिळेल. हे आसामच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यास हातभार लावेल.
Tomorrow evening, I would be in Haldia, West Bengal. At a programme there, will dedicate to the nation the the LPG import terminal built by BPCL. Will also dedicate to the nation Dobhi–Durgapur Natural Gas Pipeline section of the Pradhan Mantri Urja Ganga project. pic.twitter.com/LepDe6dQEC
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2021
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विश्वनाथ आणि चराईदेव येथील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी पायाभरणी केली जाईल. यामुळे आसामच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळेल. गेल्या काही वर्षात राज्यात आरोग्य सेवांमध्ये जलद प्रगती झाली आहे. याचा फायदा फक्त आसामच नाही तर संपूर्ण ईशान्य भागात झाला.
दोन मोठे प्रकल्प देशाला समर्पित करणार 'उद्या संध्याकाळी मी पश्चिम बंगालच्या हल्दियात आहे. तेथील एका कार्यक्रमात बीपीसीएलने बांधलेले एलपीजी आयात टर्मिनल देशाला समर्पित केले जाईल. पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्पातील डोभी-दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइन विभागदेखील समर्पित केला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.
पीएम मोदी म्हणाले की यानंतर हल्दिया रिफायनरीच्या दुसऱ्या उत्प्रेरक-आयसोडेक्सिंग युनिटची पायाभरणी केली जाईल. हल्दियाच्या रानीचक येथे एनएच 41 येथे चौपदरी असलेल्या आरओबी-कम उड्डाणपुलाचे उद्घाटनही होईल.