(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi UNGA Speech : दहशतवादाला खतपाणी घालाणाऱ्यांनी विचार करावा, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
भारतात या लस निर्मिती करा
भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले आहे.
भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली
भारतात कोविन अॅपवर दिवसाला तीन कोटी लोकांच्या लसीकरणाची नोंद होते. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. 12 वर्षापुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लस भारताने विकसीत केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं अभियान आहे
चहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे.
भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे. भारतातील विविधता ही भारताची ताकद आहे भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना मदत झाली पाहिजे
अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना मदत झाली पाहिजे. अनेक देशात कट्टरतावाद वाढतोय असे देखील मोदी या वेळी म्हणाले.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीला सामोरे जात आहे. मी अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी अशा भयंकर साथीच्या आजारात आपले प्राण गमावले. अशा कुटुंबियांसोबत माझी संवेदना व्यक्त करतो.