(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Language Row : PM मोदींच्या चेन्नई दौऱ्यामुळे तामिळ भाषा का आली चर्चेत? 5000 वर्षे जुन्या भाषेबद्दल जाणून घ्या
Language Row : पंतप्रधान मोदींच्या चेन्नई दौऱ्यात तमिळचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तामिळ भाषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Language Row : पंतप्रधान मोदींच्या चेन्नई दौऱ्यात तमिळचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तमिळ भाषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तमिळला उच्च न्यायालयाची अधिकृत भाषा बनवण्याची विनंती केली. चेन्नईमध्ये, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान (PM Modi) तामिळनाडूमध्ये आले आहेत, तेव्हा मी त्यांना काही गोष्टींसाठी आवाहन करतो. तमिळला उच्च न्यायालयात अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मी पंतप्रधानांना विनंती करतो.
तमिळलाही हिंदीप्रमाणे समान अधिकार मिळायला हवे
आपली भाषा तमिळलाही हिंदीप्रमाणे समान अधिकार मिळायला हवेत, औपचारिक भाषा म्हणून मान्यता मिळायला हवी, असे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले. आमच्यावर हिंदी लादू नये. त्याच वेळी, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान तमिळ भाषा शाश्वत आणि तमिळ संस्कृती जागतिक असल्याचे देखील सांगितले. यानंतर तामिळ भाषेची चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत तमिळ भाषेची माहिती घेणेही महत्त्वाचे आहे, ही भाषा किती जुनी आहे, ती कुठे बोलली जाते, किती भाषक आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तमिळ भाषा किती जुनी आहे?
तमिळ भाषा ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील प्राचीन भाषांपैकी एक मानली जाते. अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. असे मानले जाते की या भाषेचा उगम सुमारे 5000 वर्षांपूर्वी झाला. माहितीनुसार, तमिळमध्ये इतर भाषांच्या तुलनेत खूपच लहान वर्णमाला आहे. यात फक्त 12 स्वर आणि 18 व्यंजने आहेत.
तमिळ कुठे बोलली जाते?
ही भारतातील पाचवी सर्वात मोठी भाषा आहे. तामिळ भाषा ही भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर सिंगापूर आणि श्रीलंकेत तमिळला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या इतर चार दक्षिण भारतीय राज्यांमध्येही तमिळ बोलली जाते. मलेशिया, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस यासह तमिळ प्रवासांकडून अनेक देशांमध्ये बोलली जाते. ही भारताच्या राज्यघटनेतील 22 अनुसूचित भाषांपैकी एक आहे.