Modi Cabinet : मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये 72 मंत्री! भाजपचे सर्वाधिक 60 मंत्री; शिवसेना, RPIला एक-एक राज्यमंत्रीपद
PM Narendra Modi Cabinet : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी मिळाली आहे, त्यांची सविस्तर यादी पाहा.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला. दिल्लीतील या सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. मोदी कॅबिनेट 3.0 चा शपथविधी संपन्न झाला आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएने 293 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजपला 240 जागा जिंकता आल्या. तर तेलगू देसम पक्षाला 16 आणि युनायटेड जनता दलाने 12 जागा जिंकल्या.
#WATCH | Narendra Modi takes oath for the third straight term as the Prime Minister pic.twitter.com/Aubqsn03vF
— ANI (@ANI) June 9, 2024
मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी?
मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी मिळाली आहे, हे जाणून घ्या. मोदी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांची यादी पाहा.
मोदी कॅबिनेट 3.0 मधील सर्व मंत्र्यांची यादी
कॅबिनेट मंत्री - 30
- राजनाथ सिंह (Rajnath Singh)
- अमित शाह (Amit Shah)
- नितीन गडकरी (Nitin Gadkari)
- जे.पी.नड्डा (JP Nadda)
- शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan)
- निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman)
- कुमारस्वामी (Kumaraswamy)
- मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)
- डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar)
- धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)
- जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi)
- राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh)
- पीयुष गोयल (Piyush Goyal)
- सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal)
- डॉ.वीरेंद्र कुमार (Dr. Virendr Kumar)
- के राममोहन नायडू (K. Rammohan Naidu)
- वीरेंद्र खटीक (Virendra Khatik)
- ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Madhavrao Scindia)
- अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)
- गिरीराज सिंह (Giriraj Singh)
- जुएल ओराम (Jual Oram)
- भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav)
- हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri)
- किरेन रिजुजू (Kiren Rijiju)
- गजेंद्र सिंह शिखावत (Gajendra Singh Shekhawat)
- अन्नपूर्णा देवी(Annapurna Devi)
- चिराग पासवान (Chirag Paswan)
- गंगापूरम किशन रेड्डी (Gangapuram Kishan Reddy)
- डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya)
- सी आर पाटील (C R Patil)
राज्य मंत्री - 36
- रामदास आठवले
- रक्षा खडसे
- मुरलीधर मोहोळ
- जितिन प्रसाद
- पंकज चौधरी
- अनुप्रिया पटेल
- एसपी सिंह बघेल
- कीर्तिवर्धन सिंह
- बीएल वर्मा
- कमलेश पासवान
- रामनाथ ठाकुर
- नित्यानंद राय
- सतीश दुबे
- राजभूषण चौधरी
- नीमूबेन बमभानिया
- एल मुरुगन
- दुर्गादास उइके
- सवित्री ठाकुर
- वी सोमन्ना
- शोभा करांदलाजे
- कृष्णपाल गुर्जर
- पवित्रा मार्गेरिटा
- भूपती राजू
- श्रीनिवास वर्मा
- भागीरथ चौधरी
- संजय सेठ
- बंडी संजय कुमार
- श्रीपद यशो नाइक
- शांतनु ठाकुर
- सुकांता मजूमदार
- सुरेश गोपी
- जॉज कुरियन
- अजय टम्टा
- रवनीत सिंह बिट्टू
- तोखन साहू
- हर्ष मल्होत्रा
स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री
- प्रताप राव जाधव
- जयंत चौधरी
- इंद्रजित सिंह राव
- अर्जुन राम मेघवाल
- जितेंद्र सिंह
मंत्रिमडळात कोणत्या पक्षाला किती पदं?
- भाजप - 60
- शिवसेना - 1
- तेलगू देसम पक्ष - 2
- जेडीयू - 2
- जेडीएस - 1
- आरपीआय - 1
- आरएलडी - 1
- अपना दल - 1
- लोक जनशक्ती पार्टी - 2
- हिंदूस्थान आवाम मोर्चा - 1
#WATCH | BJP leader JP Nadda takes oath as a Union Cabinet minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government at Rashtrapati Bhavan in Delhi pic.twitter.com/knM5gxYy58
— ANI (@ANI) June 9, 2024
#WATCH | BJP leader Nitin Gadkari takes oath as a Union Cabinet Minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government pic.twitter.com/yehjO8ffjD
— ANI (@ANI) June 9, 2024
#WATCH | BJP leader Dr S Jaishankar takes oath as a Union Cabinet Minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government pic.twitter.com/Bp5aN1Ad0f
— ANI (@ANI) June 9, 2024
#WATCH | LJP (Ram Vilas) chief Chirag Paswan sworn-in as Union Minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government pic.twitter.com/WbnraEpSKj
— ANI (@ANI) June 9, 2024
कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ?
मोदी सरकार मंत्रिमंडळात 72 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये सर्व सामाजिक गटांचे नेतृत्व करणारे चेहरे या मंत्रिमंडळात आहेत. यामध्ये 27 OBC, 10 SC, 5 ST, 5 अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश आहे. यातील 18 मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश आहे.
मोदी सरकारचं अनुभवी मंत्रिमंडळ
एनडीए (NDA) च्या 11 मंत्र्यांकडे अनुभव आणि कौशल्य आहे. केंद्रीय कामकाजाच्या अनुभव असलेले, संसदेत 3 किंवा त्याहून अधिक वेळा सेवा करणारे 43 मंत्री या कॅबिनेटमध्ये आहेत. यामधील 39 यापूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होते. राज्यातील कामकाजाचा अनुभव असणारे अनेक माजी मुख्यमंत्री, राज्य विधिमंडळात काम केलेले 34 मंत्री आणि 23 राज्यांमध्ये मंत्री म्हणून काम केलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.