PM Modi Swearing In Ceremony Live : मंत्रिपदासाठी खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोनाफोनी; राज्यात पाच खासदारांची रिंग वाजली!
NDA Cabinet Ministers List : नरेंद्र मोदी चहापान करत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे.
![PM Modi Swearing In Ceremony Live : मंत्रिपदासाठी खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोनाफोनी; राज्यात पाच खासदारांची रिंग वाजली! PM Modi Swearing-In Ceremony Live Phone calls to MPs from Delhi since morning for ministerial posts Three MPs in the maharashtra rang the bell PM Modi Swearing In Ceremony Live : मंत्रिपदासाठी खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोनाफोनी; राज्यात पाच खासदारांची रिंग वाजली!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/3a954e927fa2baa4bc1331f9c10e85f11717906412485736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NDA Cabinet Ministers List : नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले आहेत. टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आला आहे. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी फोन आला आहे. या सर्व नेत्यांचा मोदी 3.0 मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतरच नावे फायनल झाली असून आता कॉल्स येऊ लागले आहेत. या लोकांना आजच शपथही घेता येईल.
राज्यात 10 वाजेपर्यंत 5 जणांना फोनाफोनी
दरम्यान, राज्यातून आज (9 जून) सकाळी दहावाजेपर्यंत तिघांना फोन आला असून यामध्ये अपेक्षेनुसार नितीन गडकरी, पियूष गोयल आणि रक्षा खडसे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव याना संधी देण्यात आली आहे. रामदास आठवले यांनाही मंत्रिपदासाठी कॉल आला आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु असताना अद्याप त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नसल्याचे समोर आलं आहे.
आतापर्यंत कोणत्या नेत्यांचे फोन आले?
डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी)
किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी)
अर्जुन राम मेघवाल (भाजप)
सर्बानंद सोनोवाल (भाजप)
अमित शहा (भाजप)
नितीन गडकरी (भाजप)
राजनाथ सिंह (भाजप)
पियुष गोयल (भाजप)
ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप)
एचडी कुमारस्वामी (जेडीएस)
चिराग पासवान (लोजप-आर)
जयंत चौधरी (RLD)
अनुप्रिया पटेल (अपना दल)
जीतन राम मांझी (HAM)
मोदी शपथ घेणाऱ्या खासदारांची भेट घेणार
नरेंद्र मोदी सकाळी 11.30 वाजता चहापानावर शपथ घेतलेल्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. टीडीपी आणि जेडीयू हे दोन पक्ष प्रमुख मंत्रालयांवर दावा करत आहेत. सभापती पदाला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, लवकरच मंत्र्यांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजपच्या खात्यात कोणती मंत्रिपद जाऊ शकते?
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्कृतीसारख्या भक्कम वैचारिक बाबी असलेल्या दोन मंत्रालयांची कमानही भाजप खासदारांकडे जाऊ शकते. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे मिळू शकतात, असे मानले जात आहे. शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांसारखे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले माजी मुख्यमंत्रीही नव्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना फो अजून आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)