PM Modi : पंतप्रधानांचा आज वाराणसी दौरा; 1500 कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण करणार
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या लोकसभा मतदारसंघाचा म्हणजे वाराणसीचा दौरा करणार असून त्या निमित्ताने 1500 कोटींच्या विकासकामांचे उद्धाटन आणि लोकार्पण करणार आहेत. पुढच्या वर्षीच्या सुरुवातील उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका होणार असून त्याचे पडघम आतापासूनच वाजत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा आजचा दौरा हा महत्वाचा आहे.
पंतप्रधान आपल्या दौऱ्यामध्ये विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. त्यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठातील 100 बेड्सच्या एमसीएच विंगचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गौदौलियामधील एक बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदीतील पर्यटनाच्या विकासाठीच्या नवीन रो-रो नौका आणि वाराणासी-गाजीपूर महामार्गावरील तीन लेनच्या फ्लाय ओव्हरसोबतच विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये एकूण 744 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर 839 कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी करम्यात येणार आहे. त्यामध्ये सेंटर फॉर स्कील अॅन्ड टेक्निकल सपोर्ट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग, जल जीवन मिशन योजने अंतर्गत 143 ग्रामीण परियोजना आणि कारखियांव या गावातील भाज्यांच्या पॅकिंग करणाऱ्या हाऊसचे उद्घाटन कार्यक्रमांचा समावेश आहे.
दुपारी 12 वाजून 15 मिनीटांनी पंतप्रधान इंटरनॅशनल को-ऑपरेशन अॅन्ड कन्व्हेंशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. या सेंटरची निर्मिती जपानच्या मदतीने करण्यात आली आहे. त्यानंतर पंतप्रधान बनारस हिंदू विद्यापीठातील माता आणि बाल आरोग्य केंद्राची पाहणी करणार आहेत. तसेच या दौऱ्यात पंतप्रधान हे कोरोना काळातील करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार असून त्यामध्ये विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधान पुन्हा दिल्लीकडे प्रस्थान करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :