एक्स्प्लोर

पैसे डिपॉझिट करतो असं सांगून ज्येष्ठ नागरिकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक, कुरार पोलिसांची कारवाई

Mumbai Police : एटीएम मधून पैसे डिपॉझिट करत असल्याचं सांगत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना कुरार पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : एटीएममधून पैसे डिपॉझिट करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करुन त्यांच्याकडे असलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दोन आरोपींना कुरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ज्या ठिकाणी एटीएम मशीनमध्ये सुरक्षारक्षक नसायचे आणि तिथे येणारा व्यक्ती हा ज्येष्ठ नागरिक असेल त्या ठिकाणच्या एटीएमपाशी हे आरोपी जाळे टाकून पैसे हडपायचे.  नागरिक सीनियर सिटीजन असायचं. 

कुरार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी परिसरामध्ये राहणाऱ्या किशोरी लाल अमृतलाल बिस्सा ( 60 वर्ष ) मलाड पूर्वेत बँक ऑफ इंडिया च्या ATM मध्ये 7 जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एक लाख रुपये जमा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तीन जण त्या एटीएम जवळ होते. एक जण एटीएमच्या आतमध्ये होता तरी दोन जण एटीएमच्या गेटसमोर बाहेर उभे होते. 

जेव्हा किशोरीलाल पैसे डिपॉझिट करत होते, तेव्हा त्याच वेळी एटीएमच्या आत मध्ये उभा असलेला व्यक्ती किशोरीलाल यांच्या मदतीला गेला. त्याने मदतीच्या बहाण्याने पहिला पैसे किशोरीलाल यांच्या अकाउंट मध्ये जमा केले. नंतर किशोरीलाल बाहेर गेल्यावर ते ट्रान्झिशन कॅन्सल केले आणि जमा करण्यासाठी आणलेले सर्व पैसे एटीएम मधून बाहेर काढले. रक्कम मिळताच हे तिघे आरोपी फरार झाले. 

आपल्या खात्यावर पैसे आलेच नसल्याचं समजताच किशोरीलाल यांना आपल्याला फसवलं गेल्याचं लक्षात आलं. त्यांनी थेट पोलिसांत जाऊन तशी तक्रार नोंदवली. पोलिसांनी एटीममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कुरार पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Nagpur Cyber Crime: शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur Police: नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Embed widget