एक्स्प्लोर

PM Modi UAE Visit : दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE साठी रवाना, राष्ट्रपती शेख बिन जायद यांची घेणार भेट

PM Modi France-UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE) साठी रवाना झाले आहेत.

PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहाटे संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर (PM Modi France Visit) युएई (UAE) साठी रवाना झाले आहेत. संयुक्त अरब अमिराती (President of the United Arab Emirates) ते राष्ट्रपती शेख बिन जायद (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांची भेट घेतील. युएईसाठी रवाना होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, माझा युएई दौरा आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल. भारत आणि UAE फिनटेक संरक्षण सुरक्षा आणि ऊर्जा यासह विविध क्षेत्रात एकत्र मिळून काम करत आहेत.

पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना

फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा फ्रान्स दौरा संस्मरणीय झाल्याचं सांगितलं आहे. बॅस्टिल डे सोहळ्यात सहभागी झाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फ्रान्सच्या लोकांचे प्रेम आणि आदरातिथ्य याबद्दल आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा फ्रान्स दौरा संस्मरणीय ठरला. मला बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होता आल्यामुळे हा दौरा आणखी खास झाला.''

दोन दिवसीय फ्रान्स दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी 14 जुलै रोजी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मॅक्रॉन यांच्यासोबतच्या संवादक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील विविध करारांवर चर्चा झाली.

भारतीय UPI द्वारे फ्रान्समध्येही व्यवहार

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, भारत आणि फ्रान्समध्ये भारताचा 'युनिफाइड पेमेंट इंटरफेस' (UPI) उपलब्ध करून देण्यासाठी करार झाला आहे. असे करणारा फ्रान्स हा पहिला युरोपीय देश आहे. संरक्षण मंत्रालयाने 13 जुलै रोजी फ्रान्सकडून राफेल जेटचे 26 नौदल प्रकार आणि तीन फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'संरक्षण सहकार्य हा आमच्या घनिष्ठ संबंधांचा मजबूत आधारस्तंभ आहे. हे दोन्ही देशांमधील विश्वासाचं प्रतीक आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमात फ्रान्स महत्त्वाचा भागीदार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
Embed widget