एक्स्प्लोर
Advertisement
लढाऊ पाणबुडी कलवरी नौदलाच्या ताफ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च अशा दर्जाची पाणबुडी असल्यानं देशाच्या नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीची ‘कलवरी’ ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल झाली आहे. मुंबईतल्या माजगाव डॉकयार्डवर पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते कलवरी पाणबुडी देशसेवेत रुजू झाली.
कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च अशा दर्जाची पाणबुडी असल्यानं देशाच्या नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. देशाच्या सागरी सुरक्षेला मोठी मदत ही कलवरी पाणबुडी देणार आहे.
मुंबई डॉकयार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पाणबुडी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलप्रमुख सुनिल लांबा हे उपस्थित होते.
मुंबई डॉकयार्डमधील कर्मचाऱ्यांचं आंदोलन
एकीकडे कलवरी पाणबुडीचा लोकार्पण सोहळा सुरु असताना दुसरीकडे मुंबई डॉकयार्डमधील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या कारणावरुन आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात तब्बल 3000 कर्मचारी सहभागी झाले होते.
पाणबुडीचा लोकापर्ण कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केलं. दरम्यान, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या मागण्या प्रशासन आणि केंद्र सरकार पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयएनएस कलवरी पाणबुडीची वैशिष्ट्ये :
(फोटो सौजन्य : एएनआय)
लढाऊ आयएनएस कलवरी ही डझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. 1,564 टन वजनाची ही पाणबुडी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं तयार केली आहे. ही स्कॉर्पियन दर्जाची पाणबुडी आहे.
1967 साली पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी ही नौदलात दाखल झाली होती. जी 31 मे 1996 रोजी निवृत्त करण्यात आली होती. या पाणबुडीचे कमांडिंग ऑफिसर केएस सुब्रमण्यम हे होते.
ही पाणबुडी आधुनिक यंत्रणेनं सुसज्ज आहे. शत्रूच्या पाणबुडीनं हल्ला केल्यानंतर त्याला तात्काळ उत्तर देण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.
या पाणबुडीची खासियत म्हणजे ही अजिबात आवाज करत नाही. तिचा आकार हायड्रो-डायनामिक आहे. तसेच यामध्ये घातक हत्यारंही बसवण्यात आली आहे.
खोल समुद्रात या पाणबुडीची 120 दिवस चाचणी घेण्यात आली असून वेगवेगळ्या पद्धतीनं मारा करणाऱ्या हत्यांरांची चाचणी घेण्यात आली आहे.
ही पाणबुडी अगदी अचूक पद्धतीनं आपल्या टार्गेटवर निशाणा साधू शकते. तब्बल 300 किमी दूर मारा करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.
नौदलाकडे सध्या 13 पाणबुड्या आहेत. पण यापैकी अर्ध्याहून अधिक वापरात नाहीत. अशावेळी नौदलाला मजबूत करण्यासाठी कलवरी पाणबुडी तयार करण्यात आली.
कलवरी सोबत दुसरी पाणबुडी खांदेरी हिची सुद्धा चाचणी सुरु असून ती देखील लवकरच नौदलात सामील होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement