PM Kisan : लवकरच मिळणार PM किसानचा 15 वा हफ्ता, त्यापूर्वी करा 'हे' काम
आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 14 हफ्ते मिळाले आहेत. 15 वा हफ्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![PM Kisan : लवकरच मिळणार PM किसानचा 15 वा हफ्ता, त्यापूर्वी करा 'हे' काम PM Kisan samman Nidhi yojana update 15th installment can arrive in month of november PM Kisan : लवकरच मिळणार PM किसानचा 15 वा हफ्ता, त्यापूर्वी करा 'हे' काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/e9636ebfb4dde7714000e6dbb052b9ef1667978653135455_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Kisan samman Nidhi yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 14 हफ्ते मिळाले आहेत. 15 वा हफ्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या लवकरच 15 वा हफ्ता मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
चालू महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता
पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता या नोव्हेंबर महिन्यात जारी केला जाण्याची शक्यता आहे. मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आली होती. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. पंधराव्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात, असे मानले जात आहे.
लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. सध्या 14 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. पंधराव्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात, असे मानले जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवत आहे. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय, शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी तुम्हाला प्रथम www.pmkisan.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. त्यानंतर E-KYC च्या पर्यायावर जा. यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका. आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचे e-KYC केले जाईल.
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना या चुका करू नका
तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती अशी बरोबर द्या. चुकीची माहिती देऊ नका. अन्यथा तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. तसेच तुमच्या बँक खात्याबाबत चुकीची माहिती देऊ नका. तुमचा खाते क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असली तरीही तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळं तुमची माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा.
शेतकऱ्यांनी येथे संपर्क साधावा
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092. इथेही तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Kisan योजनेचा 15 वा हफ्ता मिळण्यापूर्वी 'हे' काम करा, अन्यथा मिळणार नाही हफ्ता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)