एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदी आपली इमेज बनवण्यात व्यस्त, चीनशी लढण्याची रुपरेषाचं नाही : राहुल गांधी
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आपली इमेज बनवण्यात व्यस्त आहेत. चीनशी लढण्याची रुपरेषाचं त्यांच्याकडे नाही, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे.

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आज 'ट्रुथ विथ राहुल गांधी' या मालिकेतला तिसरा व्हिडीओ शेअर केला. यात राहुल गांधी यांनी चीनविरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांजवळ कुठलीही रुपरेषा नाही त्यामुळंच चीन आपल्या हद्दीत घुसला, असा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण फोकस आपली इमेज बनवण्यावर आहे. सर्व संस्था त्याच कामात गुंतल्या आहेत. केवळ कुण्या एका व्यक्तिची प्रतिमा बनवनं म्हणजे राष्ट्राची प्रतिमा होऊ शकत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोठ्या स्तरावर विचार करूनच भारताचं रक्षण केलं जाऊ शकतं. चीनबरोबर सीमा वाद आहे आणि आपण तो सोडविला पाहिजे, पण आपला मार्ग बदलला पाहिजे. आपली विचारसरणी बदलली पाहिजे. आम्ही दोन डगरीवर उभे आहोत. जर आपण एका बाजूला गेलो तर आपल्याला यश मिळेल आणि दुसरीकडे गेलो तर विसंगत होऊन जाऊ, असं ते म्हणाले.
चीनच्या मुद्द्याबाबत काय म्हणाले राहुल गांधी चीनशी दोनहात करण्याबाबत राहुल गांधी म्हणाले की, जर आपण त्यांच्यासोबत लढण्यासाठी मजबूत स्थितीत असलो तरच आपण काम करु शकू. आपल्याला जे काही मिळवायचं ते मिळवू शकू. मात्र त्यांनी आपली कमजोरी पकडली तर गडबड होऊ शकते, असं राहुल गांधी म्हणाले. चीनशी सामोरे जाण्यासाठी आपण मजबूत स्थितीत असायला हवं. आपण चीनशी कोणत्याही दृष्टीकोनाशिवाय करार करू शकत नाही. मी केवळ राष्ट्रीय दृष्टिकोनाबद्दल बोलत नाही तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बोलत आहे. बेल्ट अँड रोड हा पृथ्वीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न आहे. भारताने जागतिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. भारताला आता एक विचार बनावा लागेल, एक जागतिक विचार असावा, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचा सिरीजमधला तिसरा व्हिडीओ राहुल गांधी यांनी 'ट्रुथ विथ राहुल गांधी' या मालिकेतला तिसरा व्हिडीओ शेअर केला. याआधी त्यांनी पहिला व्हिडीओ 17 जुलै रोजी शेअर केला होता. त्यात चीनकडून सीमेवर होत असलेलं आक्रमण, घुसखोरी यावर भाष्य केलं होतं. तर दुसरा व्हिडीओ हा 20 जुलै रोजी शेअर केला होता. यामध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या काही धोरणांवर सवाल उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदी हे डुप्लिकेट स्ट्राँगमॅनची प्रतिमा तयार करत आहेत, असं म्हटलं होतं.PM is 100% focused on building his own image. India’s captured institutions are all busy doing this task. One man’s image is not a substitute for a national vision. pic.twitter.com/8L1KSzXpiJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2020
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रीडा
करमणूक























