पंतप्रधान मोदींकडून शंभर लाख कोटींच्या योजनेची घोषणा, शंभर लाख कोटी म्हणजे एकावर किती शून्य?
Gatishakti Scheme : पंतप्रधानांची घोषित केलेली ही रक्कम म्हणजे शंभर ट्रिलियन रुपये इतकी होते. भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आकार हा दोन ट्रिलियनच्या आसपास आहे.
नवी दिल्ली : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली. देशात 'प्रधानमंत्री गति शक्ति योजना' लवकरच लॉन्च केली जाणार असून ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी असेल असं त्यांनी सांगितलं. आता हा आकडा ऐकून 100 लाख कोटी रुपये म्हणजे नेमके किती रुपये, एकावर नेमके किती शून्य या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगल सर्चवर लोकांच्या उड्या पडत आहेत.
पंतप्रधान मोदींनी सांगितलेले 100 लाख कोटी म्हणजे शंभर ट्रिलियन इतकी मोठी रक्कम आहे. एकावर असलेल्या शून्यांचा विचार केल्यास तब्बल 14 शून्य यावर लागतात. आकड्यात सांगायचं झालं तर तो 10,00,00,00,00,00,000 असा सांगता येईल. (1,000,000,000,000 (one trillion) becomes 1 lakh crore, written as 10,00,00,00,00,000).
इतकी मोठी रक्कम एका योजनेसाठी देणं शक्य आहे का?
मोदींनी घोषणा केलेल्या 'प्रधानमंत्री गति शक्ति योजने' साठी तब्बल शंभर ट्रिलियन म्हणजे 100 लाख कोटी रुपये गुंतवणं शक्य आहे का असा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आकार हा दोन ट्रिलियनच्या जवळपास आहे. मग एकाच योजनेवर इतकी मोठी रक्कम कशी देता येईल याची चर्चा आता सोशल मीडियावर जोरदारपणे सुरु आहे.
या आधी 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 5 ट्रिलियनपर्यंत वाढवणार अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. त्यावेळीही 5 ट्रिलियन म्हणजे नेमकं किती आणि त्यावर नेमके किती शून्य लागतात हे मोठ्या प्रमाणावर सर्च झालं होतं.
'प्रधानमंत्री गति शक्ति योजना' लवकरच लॉन्च केली जाणार असून ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
- Gatishakti Scheme :'गतीशक्ती योजने'ची पंतप्रधानांकडून घोषणा, युवकांना रोजगार देण्यासाठी 100 लाख कोटींची योजना
- Independence Day 2021 : भारताच्या विकासाची वेळ आलीय, सामर्थ्याचा पूर्ण वापर ही काळाची गरज: नरेंद्र मोदी
- Independence Day : पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी