एक्स्प्लोर
जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार
अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स या विभागाची जबाबदारी पियुष गोयल सांभाळतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनाच्या प्रवक्त्यांनी दिली.
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थ खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात होणारा अर्थसंकल्पही गोयल सादर करण्याची चिन्हं आहेत.
काहीच दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांना कर्करोग झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. उपचारांसाठी जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यामुळे जेटली बजेट मांडू शकणार नाहीत, अशी अटकळ बांधली जात होती. त्यानंतर जेटलींच्या खात्याचा अतिरिक्त पदभार गोयल यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स या विभागाची जबाबदारी पियुष गोयल सांभाळतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनाच्या प्रवक्त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्देश दिले आहेत.
जेटली आपला पदभार पुन्हा स्वीकारेपर्यंत गोयल त्यांच्या विभागाचा कारभार पाहतील. पियुष गोयल यांच्याकडे कोळसा आणि रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी राहणार आहेच.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. निवडणुकीमुळे हा अंतरिम अर्थसंकल्प असेल.
अरुण जेटली यांच्या मांडीमध्ये सॉफ्ट टिश्यू कॅन्सरचं निदान झालं आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून तो शरीराच्या इतर भागात जलद पसरु शकतो. मागच्याच वर्षी म्हणजे 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. आता जर केमोथेरपी केली तर त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो, असं वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. मंत्रिमंडळातील नेत्यांच्या आजारपणामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement